शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लोककल्याणाच्या योजना अंमलात आणणारे महात्मा बसवेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:59 IST

महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयीचा लेख...

महात्मा बसवेश्वरांचा जन्म वैशाख शु. अक्षयतृतीया सन ११०५ मध्ये कर्नाटकातील बागेवाडी, जि. विजापूर येथे झाला. श्रावण शुद्ध ५ (नागपंचमी) सन ११६७ मध्ये कूडल संगम, जिल्हा विजापूर येथे कृष्णा-मलप्रभा नद्यांच्या संगमात त्यांनी संजीवन जलसमाधी घेतली. (जन्मतारीख, वर्ष, जलसमाधी काल याबाबत मतभेद आहेत.)बसवेश्वरांनी शेती, वाणिज्य, सामूहिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, छोट्या उद्योगधंद्यात वाढ इत्यादी अनेक योजना आखल्या व त्या राबविल्या. शेतामध्ये विहिरी, तलाव, तळी-बंधारे यांच्या सोयी केल्या. सामूहिक श्रम आणि शिक्षणाची लोकांमध्ये आवड निर्माण केली. सामान्य आणि दलित लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आठशे वर्षांपूर्वी (बाराव्या शतकात) गरिबी हटावसारख्या योजना आखल्या व यशस्वीरीत्या पार पाडल्या.महात्मा बसेश्वर मनाने, विचाराने आणि कृतीने संत (शिवशरण) होते. ध्यान, चिंतन आणि मनन करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या दृष्टीने धर्मशील पुरुष राज्यकर्ता असावा. धर्म म्हणजे ईश्वरी गुण, धर्मशील म्हणजे ईश्वरी गुण धारण करणारा ईश्वर हा विश्वाचा शासनकर्ता आहे. राजा हा राष्ट्राचा शासनकर्ता असतो. राजा किंवा राज्यकर्ता ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून विश्वाच्या त्या भागावर राज्य करीत असतो. म्हणून जे जे ईश्वराचे गुण ते ते गुण राज्यकर्त्यांमध्ये असावे लागतात. बसेश्वरांच्या दृष्टीने राजसत्ता हे साधन आहे आणि राष्ट्राचे अंतिम हित हे साध्य आहे. राष्ट्र म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराची सगुण-साकार मूर्ती होय. आपल्या उन्नतीसाठी व्यक्तींनी, समाजांनी आणि राज्यकर्त्यांनी त्यांची पूजा करायला हवी. उन्नतीसाठी झटावयास हवे, असे त्यांना वाटे.महात्मा बसवेश्वर हे अवतारी पुरुष होते. उपजतच त्यांच्या ठिकाणी ईश्वरी गुण होते. त्यांचे हृदय शिवशरणांचे, संतांचे होते. ते धर्मशील होते. प्रापंचिक असूनही विरक्त होते. ते विज्जळ राजाचे प्रधानमंत्री होते. आदर्श शासनकर्ते होते. बालपणापासून अनेक आदर्शांची स्वप्ने ते उराशी बाळगून होते. वयाच्या २१व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या. त्या वयापर्यंत त्यांना सगुण साकार ईश्वराचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण निराकार ईश्वराचा साक्षात्कार झाला होता. राज्यकारभार स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावा हे महात्मा बसवेश्वरांचे जीवनसूत्र होते.-अनिल लक्ष्मण कोठुळे-उत्तर महाराष्ट्र प्रमुख :अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना