शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

महाराष्ट्र जम्परोपचे पारितोषिक वितरण उत्साहात

By admin | Updated: May 29, 2014 00:29 IST

नाशिक : दोरीच्या उड्या या क्रीडा प्रकारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन शरीर अधिक लवचीक होते. त्यामुळे असा खेळाडू कोणत्याही क्रीडाप्रकारात भविष्य घडवू शकतो, असे प्रतिपादन फ्रावशी इंटरनॅशनलचे संचालक रतन लथ यांनी केले.

नाशिक : दोरीच्या उड्या या क्रीडा प्रकारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन शरीर अधिक लवचीक होते. त्यामुळे असा खेळाडू कोणत्याही क्रीडाप्रकारात भविष्य घडवू शकतो, असे प्रतिपादन फ्रावशी इंटरनॅशनलचे संचालक रतन लथ यांनी केले. कालिका देवी सभागृहात आयोजित महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी केशव पाटील होते. यावेळी क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाणे म्हणाले, खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचाचा उत्साह वाढविण्यासाठी पुरस्कार हे प्रेरणादायक ठरतात. जम्परोप संघटनेमुळे दोरीवरच्या उड्यांचा खेळ राज्यात रुजविला आणि वाढविला आहे, त्यामुळे संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे, तर शारीरिक तंदुरुस्तीसाठी सर्वोत्तम व्यायाम म्हणजे जम्परोप असल्याचे डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट खेळाडू व राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, अमेरिका येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी निवड झालेल्या अनिमेश भावसार, तन्मय कर्णिक, आयुष मानकर, शंतनू पाटील, स्वामिनी शेटे, वैष्णवी शिंदे या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले. यावेळी दत्ता पाटील, गोविंद काळे, राजू शे˜ी, रमेश मारवाडी यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू, पालक, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट खेळाडू (मुले) - अनिमेश भावसार, सर्वेश पाटील.सर्वोत्कृष्ट खेळाडू (मुली) : ऐश्वर्या शिंदे (कोल्हापूर), स्मृती नायर (ठाणे)मार्गदर्शक : विक्रम दुधारे. उत्कृष्ट पंच : दीपक क्षीरसागर. उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन : जालना. शिस्तबद्ध जिल्हा : नागपूर. उत्कृष्ट खेळाडू : तन्मय कर्णिक, शंतून पाटील, स्वामिनी शेटे, संकेत परदेशी, सौरभ रणदिवे, श्वेता सिंग, इशा कुलकर्णी, प्रशांत वाघ, सोनाली वाघ, वैष्णवी हिंगे, तेजस पाटील, पूजा पाटील, माधुरी चेचर, रोहन माळी, ऋषिकेश मकदूम, राधिका वझे, सुहासिनी वझे, मयूरी काळकुटे, साक्षी चौधरी, प्रथमेश सुतार, पद्माकर चिंबोले, गणेश बुटाले, आमन वर्मा, स्मृती नायर, मयूर सावरकर, आदर्श गुप्ता, एकता पालेकर, चेतना कटारे, पल्लवी रामटेके, पूजा चांगले, चैताली माळी, श्रृती महाजन, युगंधरा खलाणे, मुजालिम शेख आदि. फोटो : महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी दत्ता पाटील, जगन्नाथ अधाणे, केशव पाटील, रतन लथ, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, रमेश मारवाडी, अशोक दुधारे, विक्रम दुधारे आदिंसह खेळाडू.