शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:44 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात येते. अंतिम मतदार यादी, नामनिर्देशन पत्राचा नमुना, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या सूचना आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती कुलुगरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

ठळक मुद्दे माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध शिक्षकांकरिता निवडणूक घेण्यात येणार दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वेळेत विविध मतदान

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात येते. अंतिम मतदार यादी, नामनिर्देशन पत्राचा नमुना, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या सूचना आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती कुलुगरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.  विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा प्राध्यापक, विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील एक याप्रमाणे पाच शिक्षकांकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्या शाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचार्यांची विद्याशाखानिहाय निवडणूक घेण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखा महिला, तर दंत विद्याशाखा अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता सोडतीद्वारे आरक्षित आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराला दहा वर्ष शिक्षकपदाचा अनुभव असणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.  नामनिर्देशनाला गुरुवार, दि. ३0 रोजी प्रारंभ होणार आहे. नामनिर्देशनाकरिता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नामनिर्देशन केले जाणार आहे. अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. अर्जाची छाननी दि. ११ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.   माघारीची मुदत २० पर्यंत   छाननीनंतर उमेदवारांच्या वैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत दि. २0 डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी दि. २१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वेळेत विविध मतदान केंद्रांवर राबविण्यात येणार आहे मतमोजणी दि. ३0 डिसेंबर रोजी विद्यापीठ मुख्यालयात होणार आहे. मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठElectionनिवडणूक