नाशिक : महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन, नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन यांच्या वतीने व मराठा सेवा संघ, क्रीडा भारती व क्रीडा साधना यांचे सहकार्याने नवरंग मंगल कार्यालयामध्ये आयोजित कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेची सांगता झाली. यजमान महाराष्ट्राच्या मुलींनी ७० गुणांसह मुलींचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर मुलांमध्ये छत्तीसगडने ९५ गुणांचा कमाई करत मुलांचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. एकत्रित प्रात्यक्षिक स्पर्धेतही छत्तीसगडने विजेतेपद पटकावले, तर मध्य प्रदेशला दुसरे स्थान मिळाले. महाराष्ट्राच्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्या खेळाडूंना शिवाजीराजे जाधव, मराठा महासंघाचे नाशिक शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यांच्या हस्ते चषक आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय जम्परोप असोसिएशनच्या सरचिटणीस सुनीता जोशी, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी लांडे, लेखाधिकारी शिरीष देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक दुधारे, राजेंद्र महाले, हंसराज वडघुले, प्रमोद अहिरराव, नितीन हिंगमिरे, आनंद खरे, विक्रम दुधारे, मधुकर देशमुख, चिन्मय देशपांडे, शशांक वझे, संजय पाटील, पांडुरंग गुरव, विनायक वझे, नयना नायर, कुणाल अहिरे, दीपक क्षीरसागर. स्पर्धेचा निकाल : सर्वसाधारण विजेतेपद मुले - छत्तीसगड (९५ गुण), महाराष्ट्र (४९ गुण), हरियाणा (२९ गुण) मुली - महाराष्ट्र (७० गुण), कर्नाटक (६० गुण), हरियाणा (४० गुण) प्रात्यक्षिक - छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र
महाराष्ट्र-छत्तीसगडला सर्वसाधारण विजेतेपद
By admin | Updated: February 22, 2015 00:24 IST