शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
2
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
3
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
4
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
5
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
6
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
7
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
8
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
9
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
10
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
11
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
12
चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
13
BCCL IPO Allotment Status: बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
14
सरकारी कर्मचारी असा की खासगी; मतदानासाठी भर पगारी सुट्टी मिळणे कायद्याने बंधनकारक!
15
इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?
16
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
17
एनपीएसधारकांसाठी आली गूड न्यूज, आता मिळणार 'निश्चित' पेन्शनची हमी! प्रकरण काय?
18
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
19
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
20
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे येथील महाराष्टÑ बॅँकेचे एटीएम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 17:24 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या एटीएमची अवस्था असून खोळंबा नसून अडचण, अशी अवस्था जाली आहे. एटीएम कार्ड असताना देखील परिसरातील ग्रामस्थांना तासनतास बॅँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या एटीएमची अवस्था असून खोळंबा नसून अडचण, अशी अवस्था जाली आहे. एटीएम कार्ड असताना देखील परिसरातील ग्रामस्थांना तासनतास बॅँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून येथील एटीएमकडून सुरळीत सेवा दिली जात नसून बॅँक प्रशासनाकडून देखील त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तालुक्यातील १५ ते १६ गावांची महत्वाची बाजारपेठ म्हणून नांदूरशिंगोटे गावची ओळख आहे. यासर्व गावांतील लोकांचा येथील बॅँक आॅफ महाराष्टÑ शाखेशी दैनंदिन व्यवहार होत असतो. बाजारपेठ मोठी असून गावचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.याठिकाणी बॅँक आॅफ महाराष्टÑाचे एकमेव एटीएम असून त्यामध्ये कधी पैसे आहेत तर कधी नाही, तर कधी मशीन बंद अशी स्थिती आहे. त्यातही ग्राहकाला कधी पैसे मिळाले तर पावती मिळत नाही, आणि कधी खात्यावरून पैसे कट होतात, मात्र, हातात मिळत नाही. त्याचप्रमाणे वेळोवेळी तांत्रिक बिघाड अशा अनेक कारणास्तव येथील एटीएम बंद असते. नांदूरशिंगोटे येथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक, व्यापारीवर्ग आणि बाजारपेठ चांगली असून एटीएमची सुविधा मात्र असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे अनेकांकडे एटीएम कार्ड असूनही पैसे काढण्यासाठी बॅँकेच्या रांगांमध्ये दोन ते तीन तास थांबावे लागत आहे. बॅँकेकडून देण्यात येणार एटीएम कार्ड केवळ शोभेची वस्तू उरली असल्याची संतप्त भावना परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. बॅँक स्तरावरून या व्यवस्थेची खातरजमा करून ग्रामस्थांची अडचण दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र