मालेगाव : तालुक्यातील आघार खुर्द येथे महाराणा प्रताप राजपूत महासंघाच्या शाखेचे उद्घाटन आमदार दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य डॉ. नवलसिंग पवार होते. यावेळी राजपूत समाजाच्या अडीअडचणी आणि विविध समस्या तसेच शहरात महाराणा प्रताप यांचे शिल्प उभारणे, याविषयीही चर्चा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, भाजपा युवा नेते लकी गिल, महासंघप्रमुख आनंदसिंग ठोके, प्रदेशाध्यक्ष संजयसिंग मगर, तालुका कार्याध्यक्ष सरदारसिंग ठोके, शाखाध्यक्ष हिंरतसिंग ठोके, उपाध्यक्ष सतीश मगर आदि उपस्थित होते.
महाराणा प्रताप महासंघ शाखेचे आघारला उद्घाटन
By admin | Updated: July 17, 2014 00:52 IST