शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर, माथेरानला पर्यटनासाठी पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:28 IST

उन्हाळी पर्यटनासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. शालेय सुटीचा अद्याप महिना शिल्लक राहिल्याने नाशिककर कुटुंबासमवेत देशाटनासाठी बाहेर पडले आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी अधिक पसंती दिली जात आहे.

नाशिक : उन्हाळी पर्यटनासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. शालेय सुटीचा अद्याप महिना शिल्लक राहिल्याने नाशिककर कुटुंबासमवेत देशाटनासाठी बाहेर पडले आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी अधिक पसंती दिली जात आहे.  राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरान व तारकर्लीसारख्या समुद्र किनाऱ्यांवरही भटकंतीची चौकशी व आगाऊ नोंदणी होत आहे. या पर्यटन स्थळांवरील रिसॉर्ट हाउसफुल्ल असून, खासगी निवासव्यवस्थाही या भागात महागली आहे. हंगाम कॅच करण्यासाठी या भागातील व्यावसायिक संपूर्णत: सज्ज असून, निवास, वाहतुकीसह भोजनव्यवस्थेचे दरही आकाशाला भिडले आहेत. शहरातून नाशिक-पुणे, नाशिक-सातारा, नाशिक-पुणेमार्गे थेट महाबळेश्वर या शिवशाही बसेसला गर्दी वाढली आहे. नाशिक-सातारा तसेच नाशिक-महाबळेश्वर बससेवा पहाटे असून, पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला शिवशाही नाशिकमधून धावत आहे. एकूणच उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने वाहतुकीचा ताण निर्माण झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसह खासगी वाहनांनीदेखील लोक पर्यटनासाठी भटकंती करताना दिसून येत आहे. नाशिक ते महाबळेश्वरचा प्रवास माथेरानच्या तुलनेत अधिक लांबचा आहे. महाबळेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य, तेथील डोंगरदºया व थंड हवामान पर्यटकांना आकर्षित करते. राज्यातील दुसरे थंड हवेचे ठिकाण व मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे नेरळजवळील माथेरानला ही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. ‘माथेरानची राणी’ रुळावर धावत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.काश्मीरकडे पर्यटकांचा कलकाश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत सातत्याने जरी चर्चा होत असली तरी उन्हाळ्यातील पर्यटनासाठी नाशिकमधून काश्मीरला अधिक पसंती मिळत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. काश्मीरचे निसर्ग सौंदर्य, खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने काश्मीर पर्यटनाला प्राधान्य देत असल्याचे टूर आॅपरेटर दत्ता भालेराव यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांकडून पर्यटकांचे आदरातिथ्यबाबत प्रचंड उत्सुकता व काळजी दाखविली जात असल्याचा पर्यटकांचा अनुभव त्यांनी सांगितला. जिल्हाभरातून सुमारे तीन ते चार हजार पर्यटक काश्मीरमध्ये पोहचले आहेत, तर काही पर्यटक परतीच्या प्रवासालाही लागले आहेत.

टॅग्स :tourismपर्यटन