शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगत ढाबे बनले मद्यपींचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:21 IST

मद्यविक्रीची परवानगी असलेले हॉटेल मालक हे शासनाने दिलेल्या वेळेनुसार हॉटेल बंद करीत असले तरी दुसरीकडे मात्र मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर मद्य पिण्याची परवानगी नसतानाही रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना जेवणाबरोबर मद्य पिण्याची परवानगी दिली जात असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिडको : मद्यविक्रीची परवानगी असलेले हॉटेल मालक हे शासनाने दिलेल्या वेळेनुसार हॉटेल बंद करीत असले तरी दुसरीकडे मात्र मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर मद्य पिण्याची परवानगी नसतानाही रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना जेवणाबरोबर मद्य पिण्याची परवानगी दिली जात असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शासनाने गेल्यावर्षी महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरातील हॉटेलमध्ये मद्यविक्री करण्यास बंदी घातली होती. ही बंदी उठविली असल्याने परिसरातील हॉटेलमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दुसरीकडे मात्र महामार्गालगतच अनधिकृतरीत्या विनापरवाना बहुतांशी ढाब्यांवर ‘बाहेरून मद्य घेऊन या व जेवणाचा आस्वाद घ्या’ अशी पद्धत सुरूच असल्याने ढाबेच बनले मद्यपींचा अड्डे अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. यातच ढाबे हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने मद्य पिऊन वाद होण्याचे प्रकारही अनेकदा घडत असल्याचे चित्र बघावयास मिळते. शासनाने मद्याचे दर अधिक केल्याने ज्या मद्यपींना बारमध्ये जाऊन मद्य पिणे परवडत नाही असे मद्यपी ढाब्यांवर जाणे पसंत करत असल्याने ढाब्यांवर विनापरवाना मद्य पिण्याची सोय असल्याने हॉटेलमधील गर्दीपेक्षा ढाबे मात्र फुल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य उत्पादक शुक्ल विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या ढाबेमालकांवर कारवाई करीत असले तरी न्यायालयात केस सुरू राहते व दुसरीकडे मात्र ढाबामालक आपला व्यवसाय पुन्हा सुरूच ठेवत असल्याने कायद्याच्या अखत्यारित राहूनच अधिकारी काम करीत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे लाखो रुपयांचा कर भरून अधिकृतपणे मद्यविक्री व पिण्याची मुभा असणाºया हॉटेल मालकांना मात्र वेळेचे बंधन असते. यानंतर हॉटेल सुरू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याने बहुतांशी हॉटेल मालक हे वेळेवरच हॉटेल बंद करीत असल्याचे दिसून येते.ढाबे संस्कृती वाढत असल्याचे चित्रमहामार्गावरील ढाब्यांवर लेट नाईट जेवणाची सोय, त्यातच बहुतांशी ढाब्यांवर बाहेरून पार्सल (मद्याचे) घेऊन येण्याची व्यवस्था असल्याने दिवसेंदिवस या ढाब्यांवर जेवणासाठी येणाºयांची संख्या वाढत आहे. यातच ढाब्यांवर हॉटेलपेक्षा कमी खर्चात निवांत बसण्याचीही सोय असल्याने ढाबे संस्कृती वाढत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय