शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्याकडून श्री काळारामाची महाआरती; ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ फलकाने लक्ष वेधले

By suyog.joshi | Updated: March 8, 2024 13:20 IST

मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली.

नाशिक (सुयोग जोशी) : सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय, ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’ च्या जयजयकारात अन पुरोहितांच्या मंत्रोच्चारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुलगा अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी येथील प्रसिद्ध श्री काळारामाची महाआरती करण्यात आली. मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली.

यावेळी मंगेश पुजारी, श्रीकांत पुजारी, नरेश पुजारी यांनी पौरोहित्य केले. विश्वस्तांच्या हस्ते राज ठाकरे यांचा मंदिराची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराभोवती पोलिसांची कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराच्या आतमध्ये तसेच पटांगणात ठराविक नागरिकांनाच प्रवेश देण्यात आला होता. प्रारंभी मंदिराच्या प्रवेशद्वारावर राज ठाकरे यांचे ढाेल पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर पुष्पांची उधळण करण्यात आली. त्यानंतर महिलांनीही ‘राम आयेंगे तो दिवाली मै मनाऊंगी’ सारखी रामाची गीते गात परिसर राममय केला होता. भजनी मंडळानेही रामाची भजने गायली. मंदिर पटांगणात राज ठाकरे यांनी नाशिक भिखू संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारर्व्इश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी, भजनी मंडळ तसेच चित्रकला महाविद्यालयाच्या मुलांची भेट घेत चौकशी केली.महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

श्री काळारा मंदिराच्या प्रवेशद्वारावर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ फलक लावण्यात आले होते. त्यातील मुख्य प्रवेशदवारावरील ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हा फलक लक्ष वेधून घेत होता. मंदिर परिसरात याच फलकाची जोरदार चर्चा रंगली होती.वर्धापनदिनी सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, दि. ९ रोजी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीही राज ठाकरे घेणार आहेत. यावेळी दुपारी ११ वाजेच्यादरम्यान राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्याच्या विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.