शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:28 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अति प्रमाणात थंडी असल्याने मन्यांना तडे जात आहे. हाती आलेला बाग वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. आपल्या बागेत उष्णता निर्माण व्हावी, आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन मन्यांना नरमपणा यावा यासाठी शेतात शेकोटे पेटवली जात आहे. धूर आणि उष्णतेच्या झळा घडांना लागल्यास घड सैल होऊन तडे जाणार नाही असे अभ्यासकांचे मत असल्याने मध्यरात्री, पहाटे बागेत शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली. गोदावरी आणि कादवा नदीचे खोरे, पाणथळ शिवार, हिरवीगार शेत, तालुक्यातून वाहणारे कालवे ,उपसा सिंचन प्रकल्प यामुळे तालुक्यातील ऐंशी टक्के भूभाग ओलिता खाली येत असल्याने बºयाचवेळा थंडी मोठ्या प्रमाणावर असते. यंदा मात्र थंडीने नीचांक गाठला आहे. वाढत्या थंडीचा फटका सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकºयांना बसत आहे. द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतो. सोने गहाण ठेऊन पिकासाठी भांडवल उभे करतो. अनेक पतपेढी, बँक यांचे शेती कर्ज काढून पीक जोमात आणतो मात्र हाती आलेले पीक कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी वाया जाते. शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो. थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे, मन्यांना तडे जात आहे. शिवाय भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतात धूर करून थंडी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी पहाटे बागेला ठिबकद्वारे पाणी देऊन झाडांमध्ये उष्णता निर्माण करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक