शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कल्याणपूर यांच्या तबल्याची जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:06 IST

ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या तबलावादनाची जादू नाशिककरांना अनुभवायला मिळाली.

नाशिक : ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या तबलावादनाची जादू नाशिककरांना अनुभवायला मिळाली. त्याचप्रमाणे पवार अकादमीचे ज्येष्ठ शिष्य सुजीत काळे यांच्या ताल त्रितालातील तबलावादन आणि सुभाष दसककर यांच्या संवदिनीच्या सुरांनीही नाशिककरांची मने जिंकली.पवार तबला अकादमी व एसडब्ल्यूएस फायनान्शियल सोल्युशनतर्फे थोरात सभागृहात ‘तालाभिषेक-२०१९’ अंतर्गत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या द्वितीय पुष्पाचा रविवारी (दि.२६) समारोप झाला. तबलाभिषेक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सारडा उद्योग समूहाचे संचालक श्रीरंग सारडा, माधुरी शर्मा, नितीन पवार आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात सुरुवातीला सुजीत काळे यांनी त्रितालातील पेशकार, कायदे, रेले, तिहाई, गत, तुकडेस चलन पारंपरिक व घराणेदार बंदिशी चक्रदार आदी तबलाविष्कारांचे सादरीकरण करीत रसिकांची वाहवा मिळविली. त्यांना संवादिनीवर ज्ञानेश्वर कासार यांनी साथसंगत केली. त्यानंतर ख्यातनाम संवादिनीवादक सुभाष दसककर यांनी राग चारुकेशीमध्ये आलाप, जोड व झाला, विलंबित तीनतालातील गत आणि द्रुत तीनतालातील बंदिश सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर ज्येष्ठ तबलावादक झाकिर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या सादरीकरणाने दाद मिळविली. त्यांना प्रशांत महाबळ यांनी संवादिनीवर साथसंगत केली. दरम्यान, नृत्यांगना सुुमुधी अथनी यांनी कथक नृत्यशैलीत व आशिष रानडे यांनी शास्त्रीय गायनात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रघुवीर अधिकारी यांनी केले. तर सुनेत्रा मांडवगणे- महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक