शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:01 IST

कळवण : कच्चा मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चामुळे कागदाचे दर महाग झाले. शाई व मुद्रण साहीत्य यांच्या किंमती देखील वाढल्या. शिवाय कुशल कामगारांचा खर्च वाढल्याने या महागाईचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक अडचणीत : कागद, शाई साहीत्यांच्या किंमतीत वाढ

कळवण : कच्चा मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चामुळे कागदाचे दर महाग झाले. शाई व मुद्रण साहीत्य यांच्या किंमती देखील वाढल्या. शिवाय कुशल कामगारांचा खर्च वाढल्याने या महागाईचा फटका ग्राहकांना बसणार आहे.कागदाच्याही किंमती वाढल्यामुळे लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका, दिनिदर्शका, अहवाल, डायरी, व्हिजिटिंग कार्ड, वही, फाईल, फोल्डर आदींच्या किंमती आता वाढणार असल्याने त्याचा परिणाम मुद्रण, प्रकाशन व्यवसायावर होणार आहे. मुद्रण व्यावसायिकांनी मुद्रण, छपाईच्या दरांमध्ये ३० टक्के एवढी वाढ करुन ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.कागदासोबतच शाई महागल्यामुळे मुद्रक अडचणीत आहे. छपाईसाठी मोठ्या प्रमाणात शाईची गरज असते. कागद, मुद्रण शाई, मुद्रण साहित्य यांच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ, कुशल कामगारांसाठी होणारा खर्च आणि यासंदर्भात शासनाची असणारी उदासीन भूमिका, या महत्वाच्या बाबींमुळे मुद्रण क्षेत्र हे अडचणींचा सामना करत आहे.आंतरराष्ट्रीयस्तरावर झालेल्या कागदाच्या भरमसाठ दरवाढीमुळे सध्याच्या किमतीमध्ये प्रिंटिंग करून देणे ही मुद्रण व्यावसायिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुद्रण व्यावसायिकांच्या दरांमध्ये किमान ३० टक्के दरवाढ केल्याने त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.या व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली आहे.नवीन उच्च दर्जाची यंत्रसामग्री ही परदेशातून मागवावी लागते. यंत्रसामग्री अतिशय महाग आहे. सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारणी करते.त्यामुळे त्याची किंमत देखील आवाक्याबाहेर जाते. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे दर्जा सुधारतो मात्र, त्याचे उत्पादनशुल्क देखील वाढत असल्याने मुद्रण व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पुणे येथील संघटनेने ३० टक्के दरवाढ गरजेचे असल्याचे सांगितल्याने ही दरवाढी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. दीड वर्षापूर्वी १७ टक्के दरवाढ करण्यात आली होती. आता ३० टक्क्यांनी दरवाढ झाल्याने लग्नपत्रिका, पत्रके, निमंत्रण पत्रिका, भिंती पत्रके, लेटरहेड, व्हीजीटीगं कार्डस् आदीमध्ये वाढ होणार आहे.कागद ,शाई इतर साहित्य यांची दरवाढी झाल्याने प्रिंटीग व्यवसायाला फटका बसणार आहे. कागदाच्या किमतीमध्ये किलोमागे सुमारे १५ ते २० रु पयांपर्यंत वाढ झाली. सध्याच्या किमतीमध्ये प्रिंटींग करून देणे अशक्य आहे.त्यामुळे सर्वच छपाई दरात वाढ होणार आहे.- उमेश सोनवणे, संचालक प्रिंटिंंग व्यावसायिक, कळवण.