पाथरे : नाशिकमधील खोडेनगर येथील अकसा कॉलनीत मस्जिद-ए-हसन संचलित मदरसा हुसैनीच्या उर्दू व अरबीचे शिक्षण घेत असलेल्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी १५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शारीरिक आजार, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, दातांचे आजार आदी तपासण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना यावेळी आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. शिबिराचे आयोजन मदरसा हुसैनी अकसा कॉलनीच्या विद्यमाने व सोपान हॉस्पिटलच्या सहकार्याने पार पडले. प्राचार्य मौलाना हाजी खलील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी अहमद रिझवान यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मदरसा हुसैनीमध्ये आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:57 IST