शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरच्या विशेष लॉकडाउन निमित्ताने मध्यप्रदेशच्या मजुरांना परत माखारी फिरवले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:32 IST

त्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशमधुन कामांसाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही. म्हणून हे मजुर आपल्या घराकडे पायी निघाले असतांना त्यांना एका ट्रकमधुन त्यांना अंबोली चेक पोस्टजवळ उतरवुन देण्यात आले. पण तेथील पोलीसांनी त्यांना नाशिक जिल्ह्यात येण्यास रोखले.परत पाठवून दिले.

ठळक मुद्दे या कामगारांच्या व्यवस्थे बाबत तालुका प्रशासनाने हात वर केले.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशमधुन कामांसाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही. म्हणून हे मजुर आपल्या घराकडे पायी निघाले असतांना त्यांना एका ट्रकमधुन त्यांना अंबोली चेक पोस्टजवळ उतरवुन देण्यात आले. पण तेथील पोलीसांनी त्यांना नाशिक जिल्ह्यात येण्यास रोखले.परत पाठवून दिले.मूळचे मध्येप्रदेशचे असलेले कामगार पालघर येथे कामासाठी गेले होते. लॉकडाऊन मुळे ते परत आपल्या मूळ गावी निघाले मात्र कोणतेच वाहन नसल्याने ते पायी निघाले रस्त्यात त्याना एक ट्रक भेटला आण िट्रक मध्ये हे सर्व कामगार अंबोली जवळ आणू सोडले ते पुन्हा पुढे आपले लहान लहान मुले घेऊन पायी पायी निघाले, मात्र त्याना पोलिसांनी पुढे जाण्यापासुन अडवले, आणि रात्रभर तिथेच काढावी लागली. याबाबतची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी श्रमजीवी संघटनेचे तुकाराम लचके यांना मिळाली त्यांनी त्या सर्व कामगारांना एकत्र करून चहा दिला व याबाबत तहसीलदार यांना कळविले. सकाळी ८ वाजता याबाबत माहिती प्रशासनाला देऊन देखील अजून कोणीही आले नव्हते. या कामगारांच्या व्यवस्थे बाबत तालुका प्रशासनाने हात वर केले.त्या कामगारांना परत पालघरला पाठवा असे पोलिसांनी सांगितले. पण यासंदर्भात मला असा कुठलाच फोन आला नसल्याचा तहसिलदार दीपक गिरासे यांनी सांगितले. यासंदर्भात आमचे अधिकारी पोलीस आहेत, ते योग्य ते निर्णय घेतील.त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. त्यांना इथे का थांबवले ते पायी चालले होते तर तुम्ही का त्याना इथे थांबवले असे उलट प्रश्न आमच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी केला.यांची तात्काळ व्यवस्था करावी याबाबत उप विभागीय अधिकारी यांनाही विनंती केली होती. असे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पण कोणी आले नाही. ते मजुर परत पालघरला गेल्याचे समजते. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या