नाशिक : जनलक्ष्मी नागरी सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी माधवराव पाटील, तर उपाध्यक्षपदी उत्तमराव कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत या दोघांचीही बिनविरोध निवड झाली.जनलक्ष्मी नागरी सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी तालुका उपनिबंधक जी. पी. मावळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बॅँकेच्या अध्यक्षपदासाठी माधवराव पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी उत्तमराव कांबळे या दोघांनीच अर्ज दाखल केले. त्यामुळे दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या ३८ वर्षांपासून माधवराव पाटील या बॅँकेचे संस्थापक संचालक आणि संस्थापक चेअरमन म्हणून काम करीत आहेत, तर उत्तमराव कांबळे गेल्या दहा वर्षांपासून उपाध्यक्षपद भूषवित आहेत. या बॅँकेची ३८ वर्षांत दुसऱ्यांदा निवडणूक झाली. गेल्या महिन्यात ८ तारखेला जनलक्ष्मी सहकारी बॅँकेची निवडणूक झाली. यावेळी केवळ तीन उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने बॅँकेला निवडणुकीला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत माधवराव पाटील आणि उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखालील समृद्धी पॅनलने सर्व जागा जिंकून बाजी मारली. (प्रतिनिधी)
जनलक्ष्मी बॅँकेच्या अध्यक्षपदी माधवराव पाटील
By admin | Updated: June 5, 2015 00:38 IST