शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

मनसेचे ‘वायफाय’ सेनेकडून हायजॅक!

By admin | Updated: February 14, 2017 01:54 IST

असाही वचननामा : निवडक योजना वगळता तेच ते

नाशिक : महापालिका निवडणुकीत साथ देणाऱ्या युवा वर्गासाठी वायफाय देण्याची घोषणा मनसेने केली खरी, परंतु घोषणांपलीकडे ती गेलीच नाही. आता मनसेने सोडलेला हा मुद्दा शिवसेनेने हाती घेतला आहे. या पक्षाच्या वचननाम्यात नाशिक शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते, बसस्टॉप वायफाय करण्याचे वचन देण्यात आले आहे. काही निवडक कल्पना वगळता त्या त्या विषयांचा समावेश वचननाम्यात करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. त्यात वायफाय योजनेचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर नवीन काहीच होत नसल्याची टीका होत असताना राज ठाकरे यांनी गांभिर्याने लक्ष घातल्याचे पत्रकारांना सांगितले. त्याचवेळी त्यांनी नाशिक शहरात वायफाय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याआधीच नाशिकच्या एका उद्योजकाने महापालिकेला आपल्याकडील बॅँडवीथ मोफत देऊन त्या आधारे शहराच्या काही भागात मोफत वायफाय देता येईल, अशी सूचना केली होती. मात्र, पालिकेने त्यात नंतर स्वारस्य घेतले नाही. आता युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी हाच मोफत वायफायचा मुद्दा सेनेने आपल्या वचननाम्यात दिला आहे. नाशिकच्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रनगरी तसेच नाशिकरोड आणि गंगापूररोड येथे कलादालन आणि नाट्यमंदिर उभारणार असल्याचे शिवसेनेने म्हटले असले तरी नाशिकरोड येथे अगोदरच नाट्यगृहासाठी जागा असून, नाट्यगृह बांधण्यासाठी १८ कोटींच्या निविदा मागविण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तर चित्रनगरी सुरू करण्याची घोषणा शिवसेनेचेच माजी मंत्री बबन घोलप यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीपासून आजवर अनेकदा केली आहे. परंतु त्यासाठी मनपा हद्दीबाहेरील जागा ताब्यात घेणे शक्य नसल्याने प्रशासनाने त्यार तसूभरही विचार केलेला नाही.नाशिकचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांंना मनपा कलावेतन देणार आणि कलाकारांसाठी आर्ट गॅलरी उभारणार या आणखी दोन नवीन कल्पना असून, त्यापैकी कलावंतांना मानधन ही शासनाची जबाबदारी आहे तर महापालिकेच्या मालकीचे महात्मा फुले कलादालन असून, त्याचे नूतनीकरण आजवर शिवसेना करू शकलेली नाही. परंतु नव्या दालनाची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेची बससेवा, न्यायालयातील प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था, क्रीडा प्रबोधिनी, एसआरए हे सर्व विषय जुनेच असून, त्यात नावीन्य काहीच नाही.