शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सांगळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 22:59 IST

माळेगाव-मापारवाडी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सूर्यभान सांगळे यांनी बिनविरोध निवड झाली. सरपंच संगीता सांगळे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी मंडळ अधिकारी माणिक गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव-मापारवाडी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सूर्यभान सांगळे यांनी बिनविरोध निवड झाली.सरपंच संगीता सांगळे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी मंडळ अधिकारी माणिक गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सुशीला सूर्यभान सांगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून माजी सरपंच संगीता सांगळे, तर अनुमोदक म्हणून अनिल आव्हाड यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. छाननी प्रक्रियेत सांगळे यांचा अर्ज वैध ठरल्याने निवडणूक अधिकारी गाडे यांनी सरपंचपदी सुशीला सांगळे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.बैठकीस मावळत्या सरपंच संगीता सांगळे, उपसरपंच जयश्री जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य अनिल आव्हाड, खंडू सांगळे, वामन गाडे, अशोक जाधव, अमोलिक जाधव, खंडू जाधव, मालती आव्हाड, हर्षदा जाधव, मीना पवार, शैला पवार आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी गाडे यांना कामगार तलाठी राहुल देशमुख, गोराणे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे, लिपिक विलास आवारी, सेवक सतीश घुगे यांनी सहाय्य केले. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच सुशीला सांगळे यांचा मावळत्या सरपंच सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच तुकाराम सांगळे, संजय सांगळे, शरद पवार, मंगेश सांगळे, सूर्यभान सांगळे, रामदास सांगळे, कचरू जाधव, लहानु सांगळे, शिवराम सांगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणsarpanchसरपंच