लोहणेर : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्र म राबविण्यात आला.देवळा तालुक्यातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे तालुकास्तरीय पाच दिवसीय निष्ठा प्रशिक्षणाचे तीन टप्प्यात प्रशिक्षण लोहोणेर येथील डॉ. डी. एस.आहेर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नुकतेच झाल्याचे गटशिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले. देवळा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील पाच शिक्षकांना पुणे येथे एनसीईआरटीमार्फत पाच दिवशीय राज्यस्तरीय साधन व्यक्ती म्हणून प्रशिक्षण देण्यात आले . यामध्ये देवळा तालुक्यातून नाना भामरे, वैशाली बच्छाव, राहुल चव्हाण, नितीन सूर्यवंशी, बाळासाहेब लांडगे या पाच शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. त्यांनी तालुकास्तरावर तालुक्यातील ४३७ शिक्षक व ६ केंद्रप्रमुख यांना तीन टप्प्यात निष्ठा प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती, क्षमता व आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, वैयिक्तक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर, आरोग्य व योगा, ग्रंथालय, पर्यावरण क्?लब, शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये, पर्यावरण विषयक जाणीवजागृती, शाळापूर्व शिक्षण, आनंददायी वातावरणात शाळा पातळीवरील मूल्यमापन आदी विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.दीक्षा अॅप, मित्रा अॅप, क्यू आर कोड, प्रत्यक्ष मोबाईल वापरून सर्व शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून घेतले गेले.हे प्रशिक्षण आजपर्यंतच्या प्रशिक्षणापेक्षा वेगळे ठरणारे आहे.
देवळा तालुक्यातील शिक्षकांचे निष्ठा प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:00 IST