लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाणीपुरवठा विषयक विविध कामांची दुरुस्ती करण्यासाठी शनिवारी (दि. १०) महावितरण कंपनीचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नाशिकरोडसह संपूर्ण शहराचा दुपारनंतर पाणीपुरवठा बंद राहिला. महापालिकेने पूर्वसूचना देऊन ठेवल्याने नागरिकांनी दिवसभरासाठी पाण्याचा साठा करून ठेवला होता. दरम्यान, रविवारी (दि.११) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले. गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील महावितरण कंपनीची एक्स्प्रेस फिडर लाइनची देखभाल व दुरुस्ती, शिवाजीनगर जलशुद्धिकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या पंपसेट्सची व्हॉल्व्ह दुरुस्ती, ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्ती, चेहेडी पंपिंग स्टेशन येथील उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती, कालिका पंपिंग स्टेशनमधील नवीन पॅनल व केबलची जोडणी, आदी कामे करण्यासाठी महावितरण कंपनीचा वीजपुरवठा शनिवारी (दि.१०) सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे, शनिवारी सकाळचा पाणीपुरवठा झाल्यानंतर दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तसेच रविवारी (दि. ११) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होणार आहे.
शहरात आज कमी दाबाने पाणीपुरवठा
By admin | Updated: June 11, 2017 00:49 IST