शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाचा पट्टा, मानवी हस्तक्षेप पुराची प्रमुख कारणे : डॉ. प्रमोद हिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 01:25 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.

ठळक मुद्दे नदी महोत्सवाची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगता
नाशिक : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.नदी महोत्सवात ‘ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. मंगळवारी (दि. २१) दरबार हॉल, सरकारवाडा येथे या महोत्सवाची सांगता झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, योगेश कासार उपस्थित होते.डॉ. हिरे म्हणाले, ज्या पुरांचे मोजमाप करण्यात आले त्यास ‘आधुनिक पूर’ म्हणतात; तर मोजमाप नसलेले पूर ऐतिहासिक पूर आहेत. नोंदी नसलेल्या प्राचीन पुरांचा अभ्यास सुरू आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पूर मोजण्याचे प्रमाण मानले जाते. मात्र तो शास्त्रीय आधार नाही. भारतात ५०० वर्षांपूर्वीच्या पुराची नोंद आढळत नाही. सक्रिय आणि जोमदार मान्सून, कमी दाबाचे पट्टे ही पुराची प्रमुख कारणे आहेत. पूर ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानवनिर्मित कारणांमुळे पुराचे प्रमाण वाढले आहे. १९६९ च्या तुलनेत गोदावरी व गिरणा नद्यांना मोठा पूर आले नसल्याचा दावा त्यांनी केला. गोदावरीला १९१९ मध्ये पूर विसर्गाने मोठा होता. तर १९६९ मध्ये पाण्याची पातळी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.--दुष्काळ अधिक त्रासदायक : जिल्हाधिकारीबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच धरणातून विसर्ग केल्यास पुराचे नियंत्रण करता येऊ शकते, असे मत डॉ. हिरे यांनी मांडले. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस येईलच असे नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दुष्काळाच्या तुलनेत पुराचा सामना करणे सोपे असते. दुष्काळ जास्त त्रासदायक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पूर आटोक्यात आणण्यासाठीचे पर्याय आणि उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी चाचपणी केली.
टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी