शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रियकराच्या बहिणीला पोलीस कोठडी

By admin | Updated: June 2, 2017 01:44 IST

नाशिकरोड : प्रेयसीचा खून करून एकलहरा रोडवर तिचा मृतदेह जाळून टाकण्यास मदत केल्याप्रकरणी प्रियकर रोहित याची बहीण मोहिनी पाटीललादेखील पोलिसांनी अटक केली आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : सातपूर येथे प्रेयसीचा खून करून एकलहरा रोडवर तिचा मृतदेह जाळून टाकण्यास मदत केल्याप्रकरणी प्रियकर रोहित याची बहीण मोहिनी पाटीललादेखील पोलिसांनी अटक केली आहे. मोहिनी हिस नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सातपूर अशोकनगर येथील रोहित रवींद्र पाटील व दिंडोरीरोड कलानगर म्हाडा कॉलनीतील हर्षदा भास्कर अहिरे या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोमवारी दुपारी रोहित व हर्षदा एकमेकांना भेटल्यानंतर ते रोहितच्या घरी गेले. रोहितच्या बहिणीचे लग्न काही दिवसांनी होते. हर्षदा व रोहितमध्ये वादविवाद झाला. संतप्त झालेल्या रोहितने चाकूने वार केल्याने ती जागीच गतप्राण झाली. रात्री एक-दीड वाजता एका सुटकेसमध्ये मयत हर्षदाचा मृतदेह ठेवून दुचाकीवरून एकलहरा येथील किर्लोस्कर कंपनीच्या कम्पाउंडलगत आणून तो पेटवून दिला. न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर बुधवारी पोलिसांनी संशयित रोहित याची कसून चौकशी केली असता हर्षदाचा खुूा केल्यानंतर बहीण मोहिनीला मोबाइलवर संपर्क साधून बोलावून घेतले. त्यानंतर रोहितने मोहिनीच्या मदतीने घरातील रक्त पुसून सर्व कपडे जाळून टाकले. तसेच गटारीत चाकू व हर्षदाचा मोबाइल टाकून दिला. त्यानंतर रात्री माईस्ट्रो दुचाकीवर रोहितच्या मागे मोहिनी मयत हर्षदाचा मृतदेह असलेली सुटकेस घेऊन बसली होती. खुनाच्या गुन्ह्यात व पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी मोहिनी रवींद्र पाटील (वय २३) हीला नाशिकरोड पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवस (५ जूनपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.