शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

कलाकार घडविण्यात रसिकांचे प्रेम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:39 IST

कोणत्याही कला क्षेत्रातील कलाकार कष्टांसोबतच रसिकांचे प्रेम महत्त्वाचे आहे, कलाकाराने कितीही परिश्रम घेऊन स्वत:ला तयार केले तरी जोपर्यंत रसिकांची दाद कलाकृतीला मिळत नाही तोपर्यंत कलाकृती यशस्वी होत नाही. याच विचारानुसार कलेच्या प्रवासात आपल्याला घडविण्यातही रसिकांचा मोठा वाटा असल्याचे असल्याचे मत नादसाधक पंडित शशिकांत (नाना) मुळ्ये यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाना मुळ्ये : ‘तबला चिल्ला’ अखंड नाद संकीर्तनास कुसुमाग्रज स्मारकात सुरुवात;‘गाणारा तबला’चे प्रकाशन

नाशिक : कोणत्याही कला क्षेत्रातील कलाकार कष्टांसोबतच रसिकांचे प्रेम महत्त्वाचे आहे, कलाकाराने कितीही परिश्रम घेऊन स्वत:ला तयार केले तरी जोपर्यंत रसिकांची दाद कलाकृतीला मिळत नाही तोपर्यंत कलाकृती यशस्वी होत नाही. याच विचारानुसार कलेच्या प्रवासात आपल्याला घडविण्यातही रसिकांचा मोठा वाटा असल्याचे असल्याचे मत नादसाधक पंडित शशिकांत (नाना) मुळ्ये यांनी व्यक्त केले.आदिताल तबला अकादमीतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे शुक्रवारी (दि.११) नादसंकीर्तन २०१९ सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी शंतणू घुणे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीला उत्तर देताना नाना मुळ््ये यांनी तबल्याचा नाद हा माझा श्वास बनल्याचे सांगतानाच आपल्या कलाप्रवासातील विविध प्रसंग उलगडून सांगितले. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ तबला वादक बापूसाहेब पटवर्धन, ओंकार गुलवाडी, अशोक कटारीया, कमलाकर वारे, राघवीर अधिकारी, मनीषा अधिकारी आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रथम सत्रात बालतबला वादक विहंग मुळ्ये याने एकल तबलावादन सादर केले. तसेच आदिताल अकादमीचे रसिक कुलकर्णी यांचेही यावेळी तबलावादन झाले. याच सत्रात तबलावादक पंडित शशिकांत (नाना) मुळ्ये यांच्यावरील प्रल्हाद आवलसकर लिखित ‘गाणारा तबला’ या पुस्तकाचे ख्यातनाम तबला वादक नयन घोष यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.पुस्तक प्रकाशनानंतर नाना मुळ्ये यांची प्रकट मुलाखत रंगली. सत्राचा शेवट मुंबईचे प्रसिद्ध तबला वादक नयन घोष यांच्या तबलावादनाने झाला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक