शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला देदीप्यमान इतिहास : झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:47 IST

नाशिक शहराला खूप मोठा आणि देदीप्यमान इतिहास आहे. शहरातील प्रत्येक चौक वेगळी आठवण बाळगून आहे. त्यांचा इतिहास जाणून घेतला तर समोरचा कधी अवाक् होतो, तर कधी आश्चर्याने आणि आनंदाने भारावून जातो. नवीन पिढीने हा इतिहास वेळ देऊन, थोडी मेहनत घेऊन नक्की जाणून घ्यावा, असे प्रतिपादन मधुकरअण्णा झेंडे यांनी केले.

नाशिक : नाशिक शहराला खूप मोठा आणि देदीप्यमान इतिहास आहे. शहरातील प्रत्येक चौक वेगळी आठवण बाळगून आहे. त्यांचा इतिहास जाणून घेतला तर समोरचा कधी अवाक् होतो, तर कधी आश्चर्याने आणि आनंदाने भारावून जातो. नवीन पिढीने हा इतिहास वेळ देऊन, थोडी मेहनत घेऊन नक्की जाणून घ्यावा, असे प्रतिपादन मधुकरअण्णा झेंडे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्रमंडळातर्फे आयोजित ‘चौकांचा इतिहास’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.  व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, मिलिंद चिंधडे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, पोथ्यापुराणातून नाशिकची मोठी माहिती मिळते. भद्रकाली, कालिकादेवी या नाशिकच्या ग्रामदेवता.  आज नाशिक सुवर्ण त्रिकोण म्हणून प्रसिद्ध असले, तरी पूर्वी नाशिकला जनस्थान, दंडकारण्य, गुलशनाबाद अशी अनेक नावे होती. मनूचा पुत्र इश्वाक याचा पुत्र दंडक राजा याचे पूर्वी नाशिकवर राज्य होते. त्याच्या मोठ्या साम्राज्यात नाशिकचा समावेश होता. त्याच्याकडून एक चूक झाली. ऋषीमुनींनी त्याला राज्य बेचिराख होईल असा शाप दिला. तो शाप खरा ठरला आणि आजचे नाशिक आणि त्याकाळचे दंडकारण्य ओस पडले. पुढे हजारो वर्षांमध्ये नाशिकमध्ये विविध स्थित्यंतरे झाली आणि नाशिक शहराने आकार घेतला. प्र. द. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी स्व. नरहरी फेणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.९० चौकांचा इतिहास मोठा रंजकआज नाशिक मोठे शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील ९० चौकांचा इतिहास मोठा रंजक आहे. तो ‘चौकांचा इतिहास’ नावाच्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक नाशिककराने हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या घरातील ज्येष्ठांशी संवाद साधून, पुस्तकांमधून, इंटरनेटद्वारे तो समजावून घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिक