शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरमधमेश्वरच्या पानथळाला चढला कमळपुष्पांचा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

गेल्यावर्षी कोरोनामुळे निसर्गप्रेमींना कमळपुष्पांचा आनंद घेता आला नव्हता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पक्षी अभयारण्य हे निसर्ग ...

गेल्यावर्षी कोरोनामुळे निसर्गप्रेमींना कमळपुष्पांचा आनंद घेता आला नव्हता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पक्षी अभयारण्य हे निसर्ग व पक्षीप्रेमींना खुले करण्यात आल्याचे नांदुरमधमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काळे यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाला की निसर्ग विविध रंग संगतीने बहरण्यास सुरुवात होते. त्यात निसर्गात उमलणाऱ्या विविध प्रजातींची फुले मानवाला नेहमीच आकर्षित करतात. असाच एक कमळपुष्पांचा बहर राज्यातील पहिले ‘रामसर’ आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविणारे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जलाशयात आकर्षण ठरत आहे. यंदा राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाची अडीच एकरावर हजारो फुले फुलली आहेत. या सौंदर्यात भर घालण्यासाठी गोदावरी नदीच्या अथांग पात्रातील या लाल-पांढऱ्या फुलांवर जखाना पक्षी बसू लागल्याने निसर्गसौंदर्य आणखीनच खुलले आहे.

इन्फो

२४०हून अधिक प्रकारचे पक्षी

नांदुरमधमेश्वर अभयारण्यामध्ये करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे २४०हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत. परिसरात ४००हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे. याशिवाय उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप दिसून येतात.

कोट...

भरतपूर अशी ओळख असणाऱ्या नांदुरमधमेश्वर येथे विविध प्रजातीची फुले सध्या बहरली आहेत. यामुळे सध्याचे वातावरणात मोहक व प्रसन्न झाले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परिसराचा पर्यटन क्षेत्र विकास अंतर्गत विकास होणे गरजेचे आहे.

- नीलेश दराडे, निसर्गप्रेमी, चापडगाव

फोटो- २६ नांदुरमधमेश्वर

नांदुरमधमेश्वरच्या पानथळावर बहरलेली कमलपुष्पे.

===Photopath===

260621\26nsk_42_26062021_13.jpg

===Caption===

फोटो- २६ नांदूरमध्यमेश्वरनांदूरमध्यमेश्वरच्या पानथळावर बहरलेली कमलपुष्पे.