शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेली पेन्शनची रक्कम ‘त्या’ दोघांमुळे मिळाली परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:03 IST

सटाणा : सध्याच्या काळात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पन्नास हजार रुपये सापडल्यानंतर कोणालाही त्याचा मोह होईल, मात्र येथील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी व ग्राहकाने बँकेच्या पायरीवर पडलेली एका ज्येष्ठ नागरिकाच्या पेन्शनची पन्नास हजार रुपयांची रक्कम बँकेकडे सुपूर्द करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देअल्पबचत प्रतिनिधीसह ग्राहकाचा बँकेतर्फे सत्कार

येथील पंडित त्र्यंबक सोनवणे यांनी गेल्या मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून पेन्शन खात्यावरील पन्नास हजार रुपये काढले. यानंतर समको बँकेच्या सेव्हिंग खात्यात ही रक्कम भरण्यासाठी ते दुपारी एक वाजता आले असता नजरचुकीने बँकेच्या पायरीवर पन्नास हजार रुपयांचे बंडल पडले, मात्र ते त्यांच्या लक्षात आले नाही. ते पैसे भरण्यासाठी काउंटरवर आले असता पन्नास हजार रुपये कुठेतरी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा महाराष्ट्र बँक गाठून चौकशी केली, मात्र तेथेही पैसे सापडले नाहीत. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी इतरत्र कुठेही याबाबत वाच्यता केली नाही किंवा बँक प्रशासनाकडे तक्रारही न करता त्यांनी सरळ घर गाठले.दरम्यान, बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी चंद्रकांत अहिरराव व बँकेचे ग्राहक निलेश कायस्थ यांना बँकेच्या पायरीवर पन्नास हजार रुपयांचे बंडल सापडले. त्यांनी ही रक्कम प्रामाणिकपणे बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र बागड यांच्याकडे जमा केले. बागड यांनी ही घटना बँकेचे अध्यक्ष कैलास येवला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र याबाबत कुणाचीही तक्रार न आल्याने सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पंडित सोनवणे यांच्याकडून पन्नास हजार रुपये पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. सोनवणे यांना फोनद्वारे या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी दि. ८ रोजी पैसे गहाळ झाल्याचे सांगितले. त्यानंतर अध्यक्ष येवला यांच्या हस्ते सोनवणे यांना बुधवारी (दि.१६) ती रक्कम परत करण्यात आली. तर प्रामाणिकपणाबद्दल अल्पबचत प्रतिनिधी अहिरराव आणि बँकेचे ग्राहक कायस्थ यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष कल्पना येवला, संचालक दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, पंकज ततार, प्रवीण बागड, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे, शाखाधिकारी जितेंद्र बागड, देवेंद्र बिरारी, भरत पवार आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक