शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
4
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
5
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
6
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
7
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
8
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
10
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
11
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
12
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
13
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
14
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
15
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
16
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
17
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
18
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
19
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
20
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक

मोहर गळाल्याने हापूसला उशीर

By admin | Updated: May 5, 2016 00:21 IST

खवय्यांचा हिरमोड : दरही चढेच राहण्याची शक्यता; अक्षयतृतीयेनंतर वाढणार उलाढाल

नाशिक : उन्हाळ्यात खवय्यांचे प्रमुख आकर्षण असलेला हापूस आंबा यंदा पहिला मोहर गळाल्याने शहरात उशिरा दाखल झाला असून, आवकेत घट झाल्याने त्याचे दरही चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हापूसचा गोडवा अनुभवण्यासाठी यंदा खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. फळांचा राजा असलेल्या आंब्यात ‘हापूस’ हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. आंबा खावा तर हापूस आणि तोही कोकणातला, अशी सर्वत्र ख्याती आहे. रत्नागिरी, देवगड येथील हापूस जगप्रसिद्ध असून, त्याची परदेशातही निर्यात होते. नाशिकमध्ये दरवर्षी साधारणत: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंबा दाखल होतो. यंदा मात्र उष्म्यामुळे आंब्याला येणाऱ्या तीन मोहरांपैकी पहिला मोहर गळून पडला. त्यानंतरचे दोन मोहरही म्हणावे तसे आले नाहीत. त्यामुळे हापूसचे उत्पादन मर्यादितच राहिले. परिणामी, सगळीकडेच हापूस पोहोचण्यास उशीर झाला. नाशकात दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणारा हापूस आंबा यंदा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात दाखल झाला असून, त्याचे दर १६० ते २०० रुपये प्रतिकिलो, तर ४०० रुपये डझन असे आहेत. हापूसची आवक मर्यादित राहणार असल्याने भाव उतरण्याची शक्यता कमीच असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यंदा आवक लांबल्याने शहरात दरवर्षी एप्रिलच्या मध्यावर होणारा आंबा महोत्सवही यंदा मेच्या पहिल्या आठवड्यात होत आहे.