शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजारात नियमांना ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:12 IST

सिन्नर : सोशल डिस्टन्सिंगला हरताळ; १७ दुचाकी जप्त

ठळक मुद्देसहायक निरीक्षक विजय माळी यांनी पाच दुचाकीचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत मोटारसायकली पोलीस ठाण्यात जमा केल्या

सिन्नर : नगर परिषदेच्या वतीने आडवा फाट्यावरील वंजारी समाजाच्या मैदानात तात्पुरत्या हलवण्यात आलेल्या भाजीबाजारात होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दोन दिवसांत १७ दुचाकी जप्त केल्या.भाजीबाजारात केवळ भाजीपाला घेण्यासाठी येणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक दुचाकीस्वार बागेत फिरायला आल्याप्रमाणे संपूर्ण भाजीबाजार मोटारसायकलवरून फिरत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यातून भाजीबाजारात धुरळा उडवण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचेही भान कुणी ठेवत नसल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.सुरुवातीला दुचाकी वाहने बाहेर उभी करण्याबाबत सूचनाही करण्यात येत होती. पोलिसांच्या जीपवरील ध्वनिपेक्षकावरून त्याबाबत वारंवार घोषणाही करण्यात आली. मात्र, त्यानंतरही अनेक उत्साही दुचाकीचालक सुसाटपणे बाजारात फिरत होते. काही तर थेट दुकानांपर्यंत गाडी घेऊन जात खरेदी करत होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश रसेडे यांनी शनिवारी (दि.१८) फिरणा-या १२ मोटारसायकली जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केल्या व त्यांच्या मालकांविरोधात संचारबंदीच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला.रविवारी (दि.१९) सहायक निरीक्षक विजय माळी यांनी पाच दुचाकीचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत मोटारसायकली पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत. सर्वांवरील गुन्हे न्यायालयात वर्ग करण्यात आले असून, न्यायालयाच्या निकालानंतरच या मोटारसायकली मालकांना परत मिळू शकणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक