शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमली रामनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:11 IST

जय सीता राम सीता, सियांवर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय’ असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत अवघी रामनगरी न्हाऊन निघाली. भक्तांच्या वाढलेल्या उत्साहात धुऱ्या ओढण्यात आल्या, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २७) श्रीराम व गरु ड रथोत्सव उत्साहात साजरा झाला.

पंचवटी : जय सीता राम सीता, सियांवर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय’ असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत अवघी रामनगरी न्हाऊन निघाली. भक्तांच्या वाढलेल्या उत्साहात धुऱ्या ओढण्यात आल्या, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २७) श्रीराम व गरु ड रथोत्सव उत्साहात साजरा झाला. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून मानल्या जाणाºया रथोत्सवाला यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आणि रथोत्सव डोळ्यात साठवला. मंगळवारी सायंकाळी उत्सव मानकरी पुष्कराजबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते गरु ड रथात रामाच्या पादुका व श्रीराम रथात भोगमूर्तीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. त्यानंतर बुवांनी आदेश दिल्यानंतर बाळू दीक्षित यांनी हिरवा ध्वज दाखवून सहा वाजता रथ ओढण्यास सुरु वात झाली.  सुरु वातीला श्रीराम व गरु ड रथाच्या मानकºयांना मानाचा गंध लावून तसेच श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राममंदिरातून भोगमूर्तीची व पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बुवांच्या हस्ते मुख्य आरती होताच पारंपरिक मार्गाने रथ ओढण्यास सुरु वात करण्यात आली.  गरु ड रथ ओढण्यास प्रारंभ झाला आणि रामरथ निघाला. राममंदिर येथून काढण्यात आलेली रथयात्रा पुढे ढिकलेनगर, नागचौक, लक्ष्मण झुला, काट्या मारुती चौक, जुना आडगाव नाक्यामार्गे, गणेशवाडी, आयुर्वेद रु ग्णालय समोरून, गौरी पटांगण, म्हसोबा महाराज पटांगणापर्यंत काढण्यात आली. रामरथ म्हसोबा पटांगणावर थांबविण्यात आला, तर गरु ड रथ नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, धुमाळ पार्इंट, मेनरोड, बोहरपट्टी, सरकारवाडा, सराफ बाजार, कपूरथळा मैदान आदी भागांतून मिरविण्यात येऊन पुन्हा दोन्ही रथ रामकुंडावर आणण्यात आले. राम व गरु ड रथाचे सूत्रसंचालन चंदन पुजारी, रघुनंदन मुठे, अविनाश दीक्षित यांनी केले. रथोत्सव यशस्वीतेसाठी रास्ते आखाडा तालीम संघ, अहल्याराम व्यायामशाळा, समस्त पाथरवट समाजातील पंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रथयात्रा सुरू होण्यापूर्वी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, माजी महापौर दशरथ पाटील, स्थायी सभापती हिमगौरी अहेर, डॉ. सुनील ढिकले, अ‍ॅड. राहुल ढिकले, गुरमित बग्गा, रूची कुंभारकर, कमलेश बोडके, राकेश शेळके, नितीन शेलार, अमित भोईर आदींसह मान्यवरांनी रथाचे दर्शन घेतले. अभिषेक, पूजन करून रामकुंडात भोगमूर्ती व पादुकांना मंत्रोच्चारात अवभृत स्नान घालण्यात आले. यावेळी महंत सुधीरदास पुजारी व ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले. रथोत्सव मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या, तर चौकाचौकात रथाचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष व मित्रमंडळाच्या वतीने शुभेच्छा फलक उभारले होते. रथोत्सवात सहभागी महिलांनी पिवळ्या, भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या, तर रथ ओढणाºया रामभक्तांनी अंगावर पांढरा सदरा परिधान करून भगवा फेटा, कपाळी अष्टगंध लावलेले होते. गरु ड रथाचा मान अहल्याराम व्यायामशाळा, तर रामरथाचा मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, समस्त पाथरवट समाजाकडे असल्याने मानकरी रथाच्या अग्रभागी थांबून रथ ओढत होते. यंदा रथोत्सवात ढोल वाद्य पथक, शहनाई वादक, सहभागी झाले होते. रथोत्सवानिमित्त रथांना विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर