नाशिकरोड : जयभवानीरोड येथून रस्त्याने पायी जाणाऱ्या वयोवृद्ध इसमास दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करीत सोन्याची साखळी, अंगठी असा ३० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. मुंबईचे नरेश कृष्णराव गांगुर्डे (६०) हे आपल्या मेहुण्याकडे आले होते. बुधवारी सकाळी ते आपल्या नातेवाइकासमवेत पायी जात असताना पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना अडवून पुढे खून झाला आहे. अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा, असे सांगितले. त्यानुसार गांगुर्डे यांनी १२ ग्रॅमची गळ्यातील सोन्याची साखळी व पाच ग्रॅमची हातातील अंगठी असे ३० हजारांचे दागिने रुमालात ठेवत असताना नजर चुकवून त्या दोघा भामट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतया पोलिसांनी वृद्धास लुबाडले
By admin | Updated: October 16, 2015 00:31 IST