शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मानूर जकात नाक्यावर लूट

By admin | Updated: November 19, 2014 01:30 IST

मानूर जकात नाक्यावर लूट

पंचवटी : चंद्रपूर जिल्ह्यातून नाशिकला मखमलाबाद शिवारात सीमेंट गोण्या घेऊन येणाऱ्या ट्रकचालकाची मानूर जकात नाक्यावर लूट करून ट्रक घेऊन पलायन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाने अवघ्या काही तासांतच पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक इंडिका कार, तलवार तसेच चाकू अशा वस्तू जप्त केल्या आहेत. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील मनोहर कालिदास सुरे या चालकाने आडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकखेडे येथून ट्रक (क्र. एमएच ३४ एटी ३४६४) मध्ये ४५० सीमेंट गोण्या घेऊन नाशिकला मखमलाबाद शिवारात सुरू असलेल्या शाळेच्या ठिकाणी येत होते. रात्री साडेअकरा वाजता ते जकात नाक्यावर आल्यानंतर त्यांनी गाडी बाजूला उभी करून ते झोपण्याच्या तयारीत होते. त्याच दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संशयित आरोपी इम्रान मुस्ताक शेख, अक्षय भानुदास गोसावी, बापू हौशिराम इंदोरे, रूपेश दामोदर भालेराव, हसिन शमशोद्दीन मणियार (रा. दोडी, सिन्नर), जाकिर रऊफ काझी (खडकाळी, भद्रकाली) यांनी सुरे यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील सात हजार रुपयांची रोकड जबरीने काढून घेतली व त्यानंतर सीमेंट गोण्या भरलेला ट्रक घेऊन पलायन केले, तर उर्वरित इंडिका कार (क्र. एमएच १४ एक्स-१२९९) मधून निघून गेले. संशयित सदरचा ट्रक घेऊन राणेनगर रस्त्याने जात असताना गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या कर्मचाऱ्यांचे लक्ष वेगाने जाणाऱ्या ट्रककडे गेले. पोलिसांनी ट्रकबाबत चौकशी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून ट्रकमधील संशयितांना ताब्यात घेतले व संशयितांनी ट्रकचालकाला लुटून ट्रक पळविल्याची कबुली दिली. त्यानंतर उर्वरित आरोपींची चौकशी केली असता ते इंडिका कारमधून येत असल्याबाबत सांगितल्याने पोलिसांनी सापळा रचून इंडिकातून पळणाऱ्या अन्य संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)