शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पूर्व भागात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 11:03 IST

शेतकरी वर्ग पावसाच्या पुनरागमनाने सुखावला आहे

ठळक मुद्दे शेतकरी वर्ग पावसाच्या पुनरागमनाने सुखावला आहे.

नाशिक/एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या परिसरातील गावांमध्ये मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केली असून, शेतकरी वर्ग पावसाच्या पुनरागमनाने सुखावला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आर्द्रा नक्षत्र कोरडेच जाते की काय या भीतीपोटी सोयाबीन पेरणी करण्यास शेतकºयांच्या मनात चलबिचल सुरू होती. मात्र मंगळवारच्या रिपरिप पावसामुळे शेतात बºयापैकी ओल निर्माण झाल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे ज्या शेतकºयांच्या डाळिंबाच्या बागा आहेत त्यांनी डाळिंबाच्या झाडाच्या बुडाजवळ उगवलेल्या जास्तीच्या अनावश्यक फांद्यांची छाटणी सुरू केली आहे. या छाटणीमुळे सध्या लागलेला फळबहार जोमाने वाढून त्यातील बियांमध्ये रसनिष्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. एकूणच नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ज्या शेतकºयांचे कोबी, फ्लॉवर काढून रिकाम्या असलेल्या शेतात खत तयार करण्यासाठी मेढपाळांनी आपले तळ ठोकले आहेत. दिवसभर मेंढपाळ मेंढ्या चारून झाल्यावर रात्री शेतात ठोकलेल्या वाड्यात मेंढ्या बसवून मुक्काम ठोकतात. मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे शेतात खत साठवले जाते. दिवसागणिक मेढ्यांचा मुक्काम पुढे सरकत असतो. हे मेंढपाळ संगमनेर परिसरातून आले असून, नाशिक तालुका पूर्व भागातला दौरा आटोपला की, मखमलाबादला मुक्काम ठोकणार असल्याचे एका मेंढपाळाने सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती