शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प; ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:09 IST

नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थानकामधून प्रवासी वाहतूक होऊ शकली नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत पुकारलेल्या या संपामुळे मूळगावी सण साजरा करण्यासाठी जाणार्‍या ...

ठळक मुद्दे सकाळ सत्रातील ३७ बसेस दुुपारी बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धावत होत्या. शहरातील रस्त्यावर डोळ्यांना ‘लाल परी’ दिसेनासी झाली होती सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा: प्रमुख मागणीसंपाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप

नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थानकामधून प्रवासी वाहतूक होऊ शकली नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत पुकारलेल्या या संपामुळे मूळगावी सण साजरा करण्यासाठी जाणार्‍या सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. पंधरवड्यापूर्वी अगोदर संपाची नोटीस देण्यात आली होती; मात्र सरकारने तोडगा काढला नाही. यामुळे संपाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.एसटी कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाला शहरात शिवसेनाप्रणीत एसटी कामगार सेना वगळता सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शविला. यामुळे नाशिक विभागातील सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

सकाळ सत्रातील ३७ बसेस दुुपारी बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धावत होत्या. एकूणच सकाळच्या सत्रातही केवळ तीस टक्के प्रवासी वाहतूक निमाणी स्थानकातून झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत सर्वच बसेसला ‘ब्रेक’ लागलेला होता. निमाणी स्थानकातून सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवासी वाहतुकीच्या आठशे फेर्‍या होतात. एकूणच शहर प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. तसेच लांब पल्ल्याची वाहतूकही बंद होती.

महामार्ग, जुने मध्यवर्ती बसस्थानक, नवीन मध्यवर्ती बसस्थानक, नाशिकरोड स्थानक यांमध्ये केवळ बसेसच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. दुपारी बारा वाजेनंतर सर्वच स्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला होता. एकूणच शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. शहरातील रस्त्यावर डोळ्यांना ‘लाल परी’ दिसेनासी झाली होती. बससेवा ठप्प झाल्याने प्रवासी वाहतुकीची सर्व भिस्त खासगी वाहतुकीवर होती. काळ्या-पिवळ्या जीप, रिक्षा, ट्रॅव्हल्सचा आधार घेत प्रवाशांनी आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र हे करताना गैरसोयीचाही प्रवाशांना सामना करावा लागला.

टॅग्स :ST Strikeएसटी संपStrikeसंप