शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उन्मळून पडलेल्या वृक्षाची शोकसभा

By admin | Updated: August 6, 2016 00:43 IST

असाही निषेध : पर्यावरणप्रेमी वेधणार लक्ष

नाशिक : काळाराम मंदिराजवळील तो वटवृक्ष खऱ्या अर्थाने आधारवड होता. अनेक दशकांचा साक्षीदार होता. परंतु दोन दिवसांपूर्वी तो कोसळला आणि परिसरातील नागरिकही हळहळले. आता याच वृक्षाला शनिवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने सारे पर्यावरणप्रेमी लक्ष वेधणार आहेत.गेल्या बुधवारी सायंकाळच्या सुमारास शंभर वर्षांचे जुने वडाचे झाड पावसाने कोसळले. त्याखाली तीन नागरिक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आणि नंतर वृक्षाची छाटणी करण्यात आली. वास्तविक हा वृक्ष म्हणजे पंचवटीची खरी ओळख होती. याठिकाणी मोजक्या असलेल्या वडाच्या झाडांपैकी एक होते. मात्र, विकासाच्या नावाखालील कृत्रिमता आणि व्यावसायिकता त्याच्या लयाला कारणीभूत ठरली. या वृक्षाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण तसेच त्यावर खिळे ठोकून लावण्यात आलेले व्यावसायिक फलक हेही कमी म्हणून वृक्षाच्या भोवती महापालिकेने पेव्हरब्लॉक टाकून बंदिस्त केल्याने या वृक्षाचे पोषण होऊ शकले नाही. इतकेच नव्हे तर पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. परिणामी आणखी किमान पन्नास वर्ष जो वृक्ष टिकून राहिला असता तो अकाली धारातीर्थी पडला. शहरात असे अनेक वृक्षांच्या बाबतीत सुरू असून झाडांच्या बुंध्याभोवती डांबरीकरण आणि पेव्हरब्लॉक बसवले जात आहेत. तसेच खिळे ठोकण्यात येत आहेत. पंचवटीची ओळख असलेल्या या एका वृक्षाच्या निमित्ताने शहरातील अन्य वृक्षांच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (दि. ६) दुपारी चार वाजता श्री काळाराम मंदिराजवळ शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नेचर क्लबचे अध्यक्ष आनंद बोरा, नरेश पुजारी, निशिकांत पगारे यांनी केले आहे.