शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धा : मेहराज सामनावीर, स्वप्नील राठोडचे वादळी अर्धशतक

By admin | Updated: December 27, 2016 01:22 IST

अथर्व विरुद्ध संदीप सामना बरोबरीत

नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सिझन- ६ च्या दहाव्या सामन्यात अथर्व रॉयल्स विरुद्ध संदीप फाल्कन्सची लढत रंगली. अत्यंत अटातटीचा झालेला हा सामना बरोबरीत राखण्यात संदीप फाल्कनला यश आले. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्याच्या या संघाच्या आशाही पल्लवित झाल्या असून, संघासाठी ४० धावांची झुंजार फलंदाजी करणाऱ्या मेहराज सय्यदला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अथर्व रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्वप्नील राठोड ५४ व कपील शिरसाठ २७ धावांच्या जोरावर १४६ धावांपर्यंत मजल मारली. त्यांनी सलामीला ७५ धावांची भागिदारी रचली. मात्र संघातील अन्य फलंदाजांनी निराशा केली. कपील शिरसाठ हा रोहित भोरेच्या चेंडूवर मोहन केसीला झेल देऊन बाद झाला. राहुल विश्वकर्माला १ धावेवर तुषार इंद्रीकरने सागर लभडेकरवी झेलबाद केले. केंदळेने संघाचा डाव सावरत १ चौकार आणि १ षटकार टोलवून २३ धावा केल्या. तो मोहन केसीच्या चांगल्या चेंडूला सीमापार पाठविण्याच्या नादात रोहित भोरेच्या हातात झेल देऊन तंबूत परतला. मयूर वाघला २ धावांवर भोरेने इंद्रीकरकरवी झेलबाद केले. जय वैष्णवने १७ चेंडू खेळताना ३ चौकार ठोकले. परंतु तोही १८ धावा करून मोहन केसीच्या चेंडूवर अमित लहामगेच्या हाती झेल देऊन बाद झाला. मागच्या सामन्यात वादळी फलंदाजी करणारा सुनील या सामन्यात केवळ २ धावा करू शकला. मेहराज सय्यदने त्याचा त्रिफळा उडविला. विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या संदीप फाल्कन्सच्या संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवर राहुल खूशवाह ११ व मुझफ्फर सय्यद १० धावा करून बाद झाले. फाल्कन्सला २२ धावांवर पहिला धक्का बसला. सुजय महाजन १७ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार मनोज परदेशीने पुन्हा एकदा संघाची धुरा खांद्यावर घेऊन चांगला खेळ केला. त्याने ३३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर मेहराज सय्यदने १७ चेंडूंमध्ये ४ षटकार व १ चौकार फटकावत नाबाद ४० धावा करून संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तत्पूर्वी संदीप फाल्कनकडून मेहराज सय्यद, मोहन केसी व रोहित भोरे यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूची वाट दाखविली. तर तुषार इंद्रीकरने एक बळी मिळवला. अथर्व रॉयल्सकडून सलील आगरकरने व रवींद्र कुमार यांनी प्रत्येकी २ व गौरव काळेने ३ फलंदाजांना तंबूत धाडले. तेजस पवारनेही १ गडी बाद केला. अत्यंत अटातटीच्या सामन्यात शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये विजेत्या संघाविषयी उत्कंठा पहायला मिळाली. (प्रतिनिधी)