शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभेसाठी पक्षाचा आदेश पाळणार :  माणिकराव कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:04 IST

कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विषयी गैरसमज न ठेवता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. काळानुसार प्रत्येकाला योग्य ती संधी मिळणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेत राहून प्रत्येकाची मने जिंका. मी नेहमी सच्चा कायकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. भविष्यात लोकसभा की विधानसभा हे पक्षाने दिलेल्या आदेशावरून ठरविण्यात येईल,

सिन्नर : कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विषयी गैरसमज न ठेवता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. काळानुसार प्रत्येकाला योग्य ती संधी मिळणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेत राहून प्रत्येकाची मने जिंका. मी नेहमी सच्चा कायकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. भविष्यात लोकसभा की विधानसभा हे पक्षाने दिलेल्या आदेशावरून ठरविण्यात येईल, असे सांगत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राजकारणात पुन्हा जोमाने सक्रिय होण्याचे संकेत दिले.  सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील माउली लॉन्स येथे माजी आमदार कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांच्या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोकाटे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतानाच भविष्यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगून पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सुनील नाईक, पांडुरंग वारुंगसे, रामा बुचुडे, नितीन शिंदे, शेखर चोथवे, योगेश माळी, वाळीबा बुरकुल, शशिकांत गाडे, बापू गोजरे या कार्यकर्त्यांनी कोकाटे समर्थकांच्या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.  सत्तेत असताना आपल्याला ज्या संस्था मिळाल्या त्या पुरेपूर तालुक्यातील जनतेसाठी वापरल्या, शेतीच्या प्रश्नाबरोबर बेरोजगारीचे प्रश्न सुटले पाहिजे, नवीन तरुण पिढीला रोजगार निर्माण झाला पाहिजे याचा विचार कायम केला. आज इंडिया बुल्स बंद पडली, अजूनही काही कंपन्या बंद पडल्या, मात्र सेनेचे उद्योगमंत्री गप्प असल्याचे ते म्हणाले. हे सगळे प्रश्न जर लोकप्रतिनिधी सोडवणार नसेल तर मग हे आपण कशाला निवडून देतो, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. सिन्नर शहरात पाणीप्रश्न असताना लोक शांत का, असे सवाल त्यांनी उपस्थित केला.  या मेळाव्यात जयंत आव्हाड, सुधाकर शिंदे, सोमनाथ भिसे, देवा आवारे, उत्तम सानप, शिवाजी हलवर, विजय आव्हाड, आकाश सहाने, मारुती बिन्नर, रामदास जायभाये, जयराम थोरात, किसन शिंदे, सुधीर रावळे या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.मी संपूर्ण तालुक्याचा कुटुंबप्रमुख...गेल्या तीन वर्षात संपर्क कमी झाल्याने गैरसमजदेखील निर्माण झाले असतील, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं ही भावनादेखील मनात येऊ शकते अन् काहीअंशी ते सत्यदेखील आहे. ज्या गोष्टी चुकल्या त्याची कबुली दिली पाहिजे अन् ज्या गोष्टी चांगल्या केल्या त्याचे समर्थनदेखील केले पाहिजे, अशी कबुलीदेखील कोकाटे यांनी यावेळी बोलताना दिली. विकासासाठी मुंबई-दिल्ली वाºया झाल्या त्यातून संपर्क कमी झाल्याने पराभव झाला. जनसंपर्क कमी होण्यात काही कौटुंबिक अडचणी होत्या. तथापि, मी माझ्या कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्याचा कुटुंबप्र्रमुख आहे. त्यामुळे या तालुक्याच्या प्रत्येक कुटुंबावर आलेले संकट हे आपले संकट आहे असे मी मानतो, असेही कोकाटे म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारण