चांदवड : गोरगरीब आदिवासी नागरिकांना रेशनकार्ड मिळूनही रेशनचे धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने कातरवाडीच्या सरपंच गीता रावसाहेब झाल्टे यांनी ग्रामस्थांसह कातरवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाला टाळे ठोकले. कातरवाडी येथील आदिवासी समाजाच्या बऱ्याच कुटुंबाना वर्षानुवर्ष रेशनकार्डच्या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले होते. तहसीलदारांकडे सातत्याने पाठपुरावा करून झाल्टे यांनी या कुटुंबाना आॅगस्ट महिन्यात रेशनकार्ड मिळवून दिले. तथापि वारंवार रेशन दुकानदाराने या आदिवासी लोकांना हुसकावून लावले. त्यामुळे या रेशन दुकानाला टाळे लावले असून, सदर दुकानाची तपासणी करण्याबाबतचे निवेदन तालुका पुरवठा अधिकारी व तहसीलदार चांदवड यांना कातरवाडीच्या ग्रामस्थांनी दिले आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
स्वस्त धान्य दुकानाला ठोकले कुलूप
By admin | Updated: March 1, 2016 22:43 IST