शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 16:42 IST

पादचा-याला अडवून त्याचा हात घट्ट पकडून ‘तू येथे चो-या करण्यासाठी आला आहे का? तुला पोलीस स्टेशनला जमा करतो’ असा दम भरला. त्यानंतर त्या युवकाला पंडित कॉलनीमध्ये फिरवून अंधाराच्या ठिकाणी घेऊन जात ‘मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार नाही’ असे सांगत ५० हजारांची मागणी केली.

ठळक मुद्दे ‘तू येथे चो-या करण्यासाठी आला आहे का? तुला पोलीस स्टेशनला जमा करतो’ असा दम ‘खाकी’चा हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली

नाशिक : शरणपूररोडवरील राजीव गांधी भवनजवळ एका पादचारी युवकाला पाठीमागून येऊन हात धरत तोतया पोलिसाने दमबाजी व मारहाण करून दहा हजाराची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) घडली होती. या घटनेची माहिती तत्काळ सरकारवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंडित कॉलनीमधून तोतया पोलिसाला रात्रीच अटक केली.याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका अज्ञात इसमाने रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास एका पादचा-याला अडवून त्याचा हात घट्ट पकडून ‘तू येथे चो-या करण्यासाठी आला आहे का? तुला पोलीस स्टेशनला जमा करतो’ असा दम भरला. त्यानंतर त्या युवकाला पंडित कॉलनीमध्ये फिरवून अंधाराच्या ठिकाणी घेऊन जात ‘मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार नाही’ असे सांगत ५० हजारांची मागणी केली. युवकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तोतया पोलिसाने बळजबरीने त्याच्या पॅन्टच्या खिशातून १० हजार रुपये काढून घेत मारहाण करून पोबारा केला. यानंतर युवकाने त्वरित घडलेला प्रकार भावाला मोबाइलवरून सांगितला. या युवकाचा भाऊ पंडित कॉलनीत आल्यानंतर त्याने तत्काळ सरकारवाडा पोलिसांची मदत मागितली. पोलिसांना सोबत घेऊन परिसरात गस्त सुरू केली असता तोतया पोलीस भामटा संशयित देवेंद्र लक्ष्मण निकम (रा. चांदवड) यास पंडित कॉलनीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी ‘खाकी’चा हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून युवकाचे दहा हजार रुपये रोख, आधार कार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी युवकाच्या फिर्यादीवरून निकम याच्या विरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक