शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे सलून व्यवसाय सापडला कैचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:39 IST

लॉकडाउन काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामध्ये सलून व्यावसायिकांना मोठी झळ बसत असल्याने सलून व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक साहाय्य करण्याची मागणी कारागिरांकडून होत आहे.

ठळक मुद्देअनेकांची उपासमार : आर्थिक मदत करण्यासाठी साकडे

वैतरणानगर : लॉकडाउन काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामध्ये सलून व्यावसायिकांना मोठी झळ बसत असल्याने सलून व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक साहाय्य करण्याची मागणी कारागिरांकडून होत आहे.सलून व्यावसायिकांचा ग्राहकांशी थेट संबंध येत असतो. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहे. ग्रामीण भागातही परिस्थिती सारखीच असून, राज्यातील सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजाशी निगडित दशक्रिया, गंधमुक्ती असे विविध कार्यही बंदच असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक स्रोत बिकट झाले आहेत. राज्यातील शहरी भागातील व्यावसायिकांचे स्वत:चे दुकान नसून भाडेतत्त्वावर असणाऱ्या व्यावसायिकांना भाडे कसे द्यायचे हा प्रश्न भेडसावत आहे. सलून व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील कारागीर शहरी भागात जाऊन रोजंदारीवर व्यवसाय करतात. गेल्या काही दिवसांपासून या कारागिरांचे उपजीविकेचे साधनच ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.सलून व्यावसायिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवलेले असून, या कारागिरांची परिस्थिती बिकट झाली आहे. कारागिरांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे असून, यासाठी नुकतेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे नाशिक महामंडळ व नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.- सुरेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, नाशिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय