शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे धान्य शेतकऱ्यांच्या घरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:48 IST

रामदास शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : वर्षभर काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेले धान्य कसेबसे मळणी करून घराच्या दारात आणले खरे मात्र लॉकडाउनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने उत्पादित धान शेतक-यांच्या घरातच पडून असून, आदिवासी विकास महामंडळाचे बंद पडलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

पेठ : वर्षभर काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेले धान्य कसेबसे मळणी करून घराच्या दारात आणले खरे मात्र लॉकडाउनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने उत्पादित धान शेतक-यांच्या घरातच पडून असून, आदिवासी विकास महामंडळाचे बंद पडलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.पेठ तालुक्यात बहुतांश शेतकरी दरवर्षी भात, नागली, खुरसणी, वरई आदी धान्य घरी वापरण्याइतपत ठेवून उर्वरित धान्य एकाधिकार धान्य खरेदी केंद्र अथवा खासगी बाजारात  शेतकरी विकून टाकतात. त्याच पैशातून खरीप हंगामासाठी आवश्यक खते, बी- बियाणे, औषधे खरेदी करतात. या वर्षी कोरोना व लोक लॉकडाउन यामुळे वाहतूक,  आठवडे बाजार व एकाधिकार धान्य खरेदी केंद्र बंद पडली. मजुरांचीटंचाई असतानाही शेतकºयांनी धान्याची मळणी केली असली तरी शेतकºयांकडे स्वत:चे वाहन नसल्याने धान्याची बाजार समित्यांपर्यंतवाहतूक करणे शक्य झाले नाही.-------शेतकºयांच्या बांधावर खरेदी कराकोरोना संकटामुळे कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने घरात धान्य असले तरी विक्र ीअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आदिवासी शेतक-यांच्या हक्काची आदिवासी विकास महामंडळामार्फत एकाधिकार धान्य केंद्र पुन्हा कार्यालयीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच शेतक-याच्या बांधावर जाऊन धान्य खरेदी योजना सुरू करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक खते, बी-बियाणे, औषधे खरेदी करतात. या वर्षी कोरोना व लोक लॉकडाउन यामुळे एकाधिकार धान्य खरेदी केंद्र बंद पडली.----------पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने शेतकºयांना आता शेतोपयोगी साहित्य खरेदी करावे लागणार असल्याने शासनाने आदिवासी शेतकºयांचे धान्य खरेदीसाठी गावोगावी खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकºयांना बी-बियाणे, खते खरेदी करणे सोपे जाईल.-हरिदास भुसारे, शेतकरी,बेलपाडा

टॅग्स :Nashikनाशिक