शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: August 29, 2016 01:58 IST

सुनील तटकरे : स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा

नाशिक : आगामी नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.कॉँग्रेसने राष्ट्रवादीमुळे नुकसान झाल्याचा जो डांगोरा पिटला आहे त्यांनी हे विसरता कामा नये की, आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षे कॉँग्रेसचा मुख्यमंत्री हा केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पाठिंबा असल्यानेच झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे कॉँग्रेसचे नुकसान नव्हे तर फायदाच झाला आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारला जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कळालेले नाहीत. शेतकरीविरोधी सरकार आहे. कांद्याला किलोमागे एक रुपया अनुदान जाहीर करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती समजलेली नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी २० वर्षे आधीच कांद्याला १०० रुपये अनुदान जाहीर केले होते, अशी टीकाही त्यांनी केली. कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनमुक्ती कायदा असो की सहकार दुरुस्ती कायदा असो, केवळ विरोधी पक्षांविरोधात पूर्वग्रह दूषित ठेवून सरकारने निर्णय घेतले. ते निर्णय आज त्यांना मागे घेण्याची व दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष कोणतीही आघाडी न करता घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढविणार आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे अधिकार देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, चिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव, विष्णुपंत म्हैसधुणे, छबू नागरे, प्रेरणा बलकवडे, प्रमोेद हिंदुराव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)