शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक रंगकर्मींना मिळणार शाबासकी

By admin | Updated: September 7, 2015 00:26 IST

पुरस्कार योजना : नाट्य परिषदेचा निर्णय

नाशिक : ज्येष्ठ रंगकर्मींनी केलेल्या कार्याचे स्मरण चिरंतन राहावे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने त्यांच्या नावाने रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या स्थानिक रंगकर्मींसाठी पुरस्कार योजना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केली. नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेची वार्षिक सभा रवींद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी दरवर्षी रंगभूमीदिनी ज्येष्ठांच्या नावाने देणाऱ्या येणाऱ्या पुरस्काराच्या माध्यमातून स्थानिक रंगकर्मींना शाबासकी देण्याची योजना जाहीर करण्यात आली. त्यात दत्ता भट यांच्या नावाने पुरुष अभिनय, शांता जोग यांच्या नावाने स्त्री अभिनय, प्रभाकर पाटणकर यांच्या नावाने उत्कृष्ट दिग्दर्शन, रावसाहेब अंधारे यांच्या नावाने उत्कृष्ट नेपथ्य, बापूसाहेब काळसेकर यांच्या नावाने उत्कृष्ट रंगभूषा आणि गिरीधर मोरे यांच्या नावाने उत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी नाशिक शाखेच्या वाटचालीचा आढावा सभासदांसमोर ठेवला. शाखेची सदस्य संख्या १३०० वर जाऊन पोहोचली असून, महाराष्ट्र बॅँकेत ठेवीही १७ वरुन २९ लाखांवर जाऊन पोहोचल्याचे ढगे यांनी सांगितले. याचवेळी देणगीदार डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी अनंत कुबल एकांकिका स्पर्धेसाठी एक लाख रुपये तर महाराष्ट्र बॅँकेकडूनही एक लाख रुपये प्रायोजित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी इंगळे, संजय गोसावी, सुरेश देवरे, अरुण रहाणे, श्याम दशपुते यांनी विविध सूचना केल्या. या सूचनांची दखल घेण्याचे कदम यांनी मान्य केले. सहकार्यवाह विजय शिंगणे यांनी इतिवृत्त वाचन, तर महेश डोकफोडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. वार्षिक हिशेब कोषाध्यक्ष रवींद्र ढवळे यांनी सादर केला. प्रवीण कांबळे यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र जाधव, ईश्वर जगताप, आदिती मोराणकर, विवेक गरुड, दत्ता पाटील, विजय रावळ, प्रदीप पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)