शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या दोन संचालक नियुक्तीसाठी लॉबिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:58 IST

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन जागा भरण्याचे राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहे. मात्र, प्राधिकरणाचे नियम वेशीला टांगून या दोन जागा भरण्याचा घाट संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन जागा भरण्याचे राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहे. मात्र, प्राधिकरणाचे नियम वेशीला टांगून या दोन जागा भरण्याचा घाट संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. ठरावीक माजी संचालकांसाठी संचालक मंडळाकडून अट्टाहास केला जात असल्याची चर्चा आहे.जिल्हा बँकेचे माजी संचालक अपूर्व हिरे (ओबीसी गट) व अद्वय हिरे (मालेगाव तालुका गट) यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिला. तत्कालीन संचालक मंडळाने हे दोन्ही राजीनामे मंजूर केले होते. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाने बँकेला पत्र पाठविले असून, त्यात या रिक्त जागा, ज्या प्रवर्गातील आहेत त्याच प्रवर्गातील पात्र सदस्यांमधून स्वीकृतीने संस्थेच्या समितीकडून संचालक मंडळाच्या सभेमध्ये निर्णय घेऊन भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने कार्यपद्धती ही नमूद केलेली आहे. त्यात प्रामुख्याने इच्छुक पात्र सभासदांकडून अर्ज मागविणे, सदर व्यक्ती सहकारातील तज्ज्ञ असावी, तिचा बँकेला लाभ होईल, असे नियम देण्यात आलेले आहे. परंतु, हे नियम पायदळी तुडवून संचालक मंडळांकडून ठरावीक व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काही संचालकांनी ठरावीक व्यक्तींच्या नावाचा अट्टाहास केला असून, त्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची जोरदार चर्चा जिल्हा बँकेच्या वर्तुळात आहे. ठरावीक नावांसाठी संचालकांमध्ये लॉबिंगही सुरू झाले आहे. त्याकरिता अनेक संचालकांनी दबाबतंत्र सुरू केल्याचे कळते. आगामी निवडणुका लक्षात घेऊन संचालकांनी नावे पुढे केल्याचे समजते. मात्र, यातील अनेक नावे ही नियमबाह्य आहेत. परंतु, ही नावे निश्चित करण्याचा संचालकांकडून घाट घातला जात असल्याचे समजते. दरम्यान, या जागा भरण्याकरिता संचालक मंडळाची विशेष बैठक बोलाविणे गरजेचे आहे. ही बैठक घेण्याचीही तयारी सुरू झाली आहे याच बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.सर्वपक्षीयांची तयारीदोन संचालक पदासाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, मविप्रचे चिटणीस अ‍ॅड. सुनील ढिकले, माजी संचालक राजेंद्र डोखळे, नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक सोहनलाल भंडारी, माजी आमदार अनिल अहेर, शिवसेनेचे कुणाल दराडे, पंढरीनाथ थोरे यांच्या नावाची चर्चा आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र