शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत!

By अझहर शेख | Updated: March 22, 2023 15:21 IST

जागतिक जल दिन विशेष: नाशिकमधील पुरातन बारवांच्या वारसा धोक्यात!

नाशिक : आदिवासी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून ‘जलजीवन मिशन’ आणि जलयुक्त शिवारसारखे अभियान राबविले जात असले तरी दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता दिसून येते. अहिल्यादेवी होळकरांच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी साकारलेल्या ऐतिहासिक देखण्या बारवांचा वारसा धोक्यात आला आहे. या बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील भूजल पातळी आजही टिकून आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने या बारवांची स्वच्छता व जलसाठ्याचा पुनर्वापराचा संकल्प प्रशासनाने केल्यास खऱ्या अर्थाने जल दिन सार्थकी लागेल.

नाशिक शहरातील नांदुरनाकाजवळ महापालिका हद्दीत जुनी बारव आढळून येते. या बारवमधील भूजल पातळीदेखील शाबूत आहे. बारवची रचना उत्कृष्ट असून होळकरांच्या सत्ताकाळातील स्थापत्यशैलीचा अद्भूत नमुना या रूपाने बघावयास मिळतो. विटा व दगडांमध्ये चुनखडीचा वापर करून तयार करण्यात आलेली या मोठ्या बारवमध्ये उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बारवची रचना अत्यंत सुंदर व देखणी आहे; मात्र दुर्दैवाने महापालिका प्रशासनाची नजर अद्यापही या बारवकडे पडलेली नाही. बारवच्या रूपाने नैसर्गिक जिवंत जलस्रोतचा चांगला पर्याय महापालिकेला उपलब्ध होऊ शकतो. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ अशाप्रकारे लोकप्रबोधन करणाऱ्या मनपाने ही बारव वाचविली तरी मोठा जलस्रोताचे संवर्धन होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

१) नाशिक ग्रामीण भागातसुद्धा अशाच प्रकारच्या जुन्या बारव बघावयास मिळतात. यामध्ये अंजनेरी गावाच्या शिवारातील जुनी दगडी बारवदेखील संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. या बारवमधील जलस्रोत अजूनही सुस्थितीत आहे. गरज आहे, बारव संवर्धनाची. याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास चांगल्या प्रकारचा जलस्रोत अंजनेरी पंचक्रोशीसाठी उपयोगात आणता येऊ शकतो.

२) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे तळवाडे शिवारातदेखील अशाचप्रकारे दगडी बांधकाम केलेली पायऱ्या असलेली जुनी बारव नजरेस पडते. या बारवमधील भूजल पातळी चांगली आहे. मात्र, याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संवर्धनाची प्रतीक्षा आहे.

३) गिरणारे गावातसुद्धा विटांचे बांधकाम असलेली भव्य जुनी बारव नजरेस पडते. या बारवचीही पाणीपातळी चांगली आहे. बारवची स्वच्छता अधूनमधून या भागातील ऐतिहासिक वारसाप्रेमींकडून केली जाते.

पाणीटंचाईच्या संकटावर होऊ शकते मात...!नाशिक जिल्ह्यात हंगामी पर्जन्यमानाची स्थिती गेल्यावर्षी समाधानकारक राहिली आहे. यामुळे अजूनही जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ भासलेली नाही. एप्रिल उजाडणार असला तरी पाणीटंचाईने अद्याप डोके वर काढलेले नाही. कारण आदिवासी तालुक्यांना अवकाळी पावसानेही मागील आठवडाभरापासून चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्हा प्रशासनाकडून जरी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला गेला असला तरी, दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबतही पावले उचलण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमी व वारसाप्रेमी संस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी