घोटी : इगतपुरी तालुक्यात आज पाचव्या दिवशीही पावसाचे प्रमाण जैसे थेच होते. काळुस्ते-कांचनगाव भागात असलेला सुमारे सव्वा टीएमसी क्षमतेचा शेणवड बु।। येथील तलाव मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. या तलावाच्या पाण्यावर शेणवड बु।।, खैरगाव, कांचनगाव, देवळे आदि गावच्या शेतीच्या सिंचन व पिण्याच्या पाण्याची भिस्त अवलंबून असल्याने हा तलाव पूर्णपणे भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शेणवड तलाव फुल्ल
By admin | Updated: August 4, 2016 01:03 IST