शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आलेल्या मोरांना मातोरीत जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:47 IST

ग्रामीण भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे.

मातोरी : ग्रामीण भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत काही दिवासांपूर्वी मातोरी नजीकच्या डोंगराला लागलेल्या आगीमुळे जीव वाचवून पायथ्याशी पळालेल्या पशु-पक्ष्यांसाठी गावातील शंकर पिंगळे यांनी पिण्याचे पाणी व खाद्याची व्यवस्था केल्याने दररोज शेकडो मोर व विविध पक्षी याठिकाणी आश्रयास येत आहेत.डोंगराळ भागातील पशु-पक्षी व जनावरे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मातोरी येथे वन्य पशु-पक्ष्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. काही दिवसांपूर्वीच मातोरी गावातील डोंगरावरील जंगलाला अचानक आग लागल्याने आगीपासून बचावासाठी तेथील पशु- पक्ष्यांनी अन्यत्र स्थलांतर केले. तर काहींनी पायथ्याशी असलेल्या शेतजमिनीकडे धाव घेतली. नेमकी हीच बाब शंकर पिंगळे या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली.पिण्याचे पाणी व खाद्यासाठी अनेक पक्षी फिरत असल्याचे पाहून पिंगळे यांनी आपल्या शेतातच प्रारंभी पाण्याची व खाद्याची सोय केली. सुरुवातीला दोन-चार दिवस त्याला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र त्यानंतर दररोज सकाळी पक्ष्यांचे थवेच्या थवे याठिकाणी येऊ लागले. विशेष करून त्यात मोरांची संख्या अधिक असून, सकाळी पाणी व खाद्यासाठी येणारे हे पक्षी दिवसभर मात्र अन्यत्र जात असले तरी, सायंकाळनंतर पुन्हा शेतात परतू लागले आहेत. त्यांची संख्या पाहता, पिंगळे यांनी मळ्याच्या शेजारी मोरांना पिण्यासाठी टाकी भरून ठेवली, त्याचबरोबर खाद्य म्हणून दाणे, वाळलेली द्राक्षे, धान्य आदी वस्तू ठेवल्या आहेत. त्यामुळे या पक्ष्यांना सदरचा भाग सुरक्षित वाटू लागला आहे. विशेष म्हणजे विविध जाती-प्रजातींच्या पक्ष्यांचे जतन करण्यासाठी मातोरी गावात शिकाऱ्यांना बंदी घालण्यातआली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक