शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यात बिबट्याच्या बछड्यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:04 IST

नामपूर : चिराई (ता. बागलाण) येथील गावच्या शेतशिवारात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्या मादी आपल्या दहा दिवसांच्या चार बछड्यांसह रात्री निघाली असता, यातील दोन बछडे विहिरीचा अंदाज न आल्याने शेतातील विहिरीत पडले. रेस्क्यू टीमने शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सुरु केलेल्या रेस्क्यू आॅपरेशन १.३० बजता संपले.

नामपूर : चिराई (ता. बागलाण) येथील गावच्या शेतशिवारात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्या मादी आपल्या दहा दिवसांच्या चार बछड्यांसह रात्री निघाली असता, यातील दोन बछडे विहिरीचा अंदाज न आल्याने शेतातील विहिरीत पडले. रेस्क्यू टीमने शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सुरु केलेल्या रेस्क्यू आॅपरेशन १.३० बजता संपले. विहिरीत उतरलेले वनमजूर कैलास पवार यांच्या मदतीने दोर व क्यारेटच्या सहाय्याने बिबट्या मादीच्या बछड्यांना सुरक्षित बाहेर काढण्यास वनविभागाला तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चिराई गावच्या शेतशिवारात भास्कर वेडू अहिरे यांची विहीर असून, सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता. यावेळी भास्कर अहिरे यांना बिबट्या मादीचे डरकाळी फोडण्याचा आवाज आला. अहिरे यांनी पाहण्यासाठी विहीरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीतील किनाऱ्याचा आसरा घेतानाचे दोन दहा दिवसांचे बिबट्या मादीचे बछडे बसल्याचे दिसले. घटनेचे गांभीर्य ओळखून अहिरे यांनी तातडीने वनविभाग यांच्याशी संपर्क साधून बिबट्या बछड्यांची माहिती दिली. थोड्याच वेळात वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए. कांबळे, वनपाल पी. आर. बोरसे यांच्यासह संजय अहिरे, साहेबराव वेडू, नामदेव अहिरे, दिनकर अर्जुन, महेंद्र युवराज आदी ग्रामस्थ हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी रेस्कू आॅपरेशन करण्यास सुरु वात केली. दरम्यान, चिराई परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच त्यांनी रेस्क्यू आॅपरेशन करण्यास प्रारंभ केला. त्यांनी वनमजूर कैलास पवार यांना विहिरीत उतरवले. पवार यांनी तातडीने दोरीने कॅरेट बांधून विहिरीत सोडले. त्यानंतर अथक प्रयत्नांनी त्या दहा दिवसांचे असलेल्या बछड्यांना कॅरेटच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक