शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोनांबे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:18 IST

तालुक्यातील कोनांबे येथे मध्यरात्री विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे वनविभागाने सुमारे दोन तास मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली.

ठळक मुद्दे रात्रीच्यावेळी कुत्रा मोठ्याने भुंकत असल्याने संशय आला. विहिरीत काहीतरी पडल्याने धप्प असा आवाज झालारात्रीच्यावेळी नागरिकांची खूपच गर्दी झाली

सिन्नर : तालुक्यातील कोनांबे येथे मध्यरात्री विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे वनविभागाने सुमारे दोन तास मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली. कोनांबे शिवारात रात्रीच्यावेळी कुत्रा मोठ्याने भुंकत असल्याने सुरेश निवृत्ती पांचवे यांना संशय आला. याचवेळी विहिरीत काहीतरी पडल्याने धप्प असा आवाज झाला. पांचवे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहताच बिबट्या कठड्याला धरून असल्याचे निदर्शनास आले. विहिरीत २५ फूट पाणी होते. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.  सुरेश पांचवे यांनी सरपंच संजय डावरे, सदस्य प्रकाश डावरे,  ज्ञानदेव भांगरे यांना बोलावून घेतले. वनकर्मचारी लोंढे यांनायाबाबत माहिती दिली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती गाव परिसरात पसरल्याने त्यास पाहण्यासाठी रात्रीच्यावेळी नागरिकांची खूपच गर्दी झाली होती. उपस्थितांच्या मोबाइल बॅटरीच्या उजेडाने बिबट्या डरकाळ्या फोडत होता. अरुण पांचवे, प्रमोद पांचवे आदींनी दोराच्या साहाय्याने विहिरीत लाकडी बाज सोडली.  दिवसा बचाव मोहीम राबविण्यास गर्दीमुळे अडथळा  येऊ शकतो. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाºयांनी मध्यरात्री  तीनच्या सुमारास बाजेच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीबाहेर  काढले. विहिरीच्या कठड्याजवळ येताच बिबट्याने बाजेवरून विहिरीबाहेर जोरदार उडी मारत धूम ठोकली.

टॅग्स :leopardबिबट्या