शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

४५६ मतदान केंद्रांचे ‘लाइव्ह वेबकास्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:44 IST

पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या सर्व हालचालींवर निवडणूक अधिकारी कार्यालयात बसून लक्ष ठेवणार आहेत.

नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या सर्व हालचालींवर निवडणूक अधिकारी कार्यालयात बसून लक्ष ठेवणार आहेत.निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, तर पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार मतदान केंद्रांवर पूर्णपणे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हातील आदिवासी, ग्रामीण भागात अशी अनेक मतदान केंद्रे आहेत की जेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचा संपर्क निर्माण होत नाही. अशा केंद्रांवरील मतदानाची अधिक काळजी जिल्हा प्रशासनाला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण आणि चांदवड या मतदारसंघांमध्ये अशी अनेक मतदारसंघ आहेत की जी संपर्काच्या कक्षेत येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पावसामुळे तर त्यात अधिकच अडचण निर्माण झाल्याने या सर्व केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याठी लाइव्ह वेबकास्ंिटग केले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून याबाबतची कार्यवाही सुरू होती. येथील यंत्रणा मतदान अधिकाऱ्यांच्या कक्षेत जोडण्यात आली आहे.रेंज नसलेल्या केंद्रांना मतदान अधिकाऱ्यांच्या कक्षेशी जोडण्यासाठी शनिवारी तयारी पूर्ण करण्यात आली. वीज तसेच इंटरनेट जोडणी करण्यात आली आहे. सदर मतदान केंद्रापासून रेंज असलेल्या ठिकाणी अधिकारी या केंद्रांवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. प्रत्येक मतदान कक्षातील मतदारांच्या हालचालींवर लक्ष या माध्यमातून ठेवले जाणार आहे.या अधिकाºयांची नजर संबंधित केंद्रावर राहणार आहे. ही अतिशय प्रभावी यंत्रणा असून, केंद्रातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याचा उत्तम मार्ग असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकVotingमतदान