शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

साधेपणाने व्हावे साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:48 IST

सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना नाशिकनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यावे यासाठी साकडे घातले आहे. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे साधेपणाने आणि कमी खर्चात व्हावे़

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?

सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना नाशिकनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यावे यासाठी साकडे घातले आहे. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे साधेपणाने आणि कमी खर्चात व्हावे़अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीचा विचार केल्यास आणि नाशिकनगरीत अखिल भारतीय पातळीवरील मराठी साहित्य संमेलन झाल्यास नाशिक शहरासह जिल्ह्याच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळ वाढीला चालना मिळणार आहे.सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावाना हे नाशिक शहरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्र मानले जाते. नाशिक शहराला मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाल्यास नाशिक शहराच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळणार आहे. या शहराला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, आदींसह अनेक मान्यवर साहित्यिकांची परंपरा लाभलेली आहे. सावानामार्फत सातत्याने विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नाशिकला साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाल्यास सावाना आपली जबाबदारी चांगल्या रितीने पार असा विश्वास वाटतो. परंतु नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन साधेपणाने साजरे व्हावे अशी माझी अपेक्षा आहे़नाशिक येथे यापूर्वीदेखील साहित्य संमेलन साजरे झाले होते, पंरतु त्यावेळी थोडाफार वाद झाला होता़ यापुढे साहित्य संमेलन झाल्यास कमी खर्चात आणि साधेपणाने साजरे करण्यात यावे़ तसेच संमेलन अध्यक्ष म्हणून नाशिकमधीलच एखाद्या ज्येष्ठ लेखकाची निवड करण्यात यावी़ कारण आता साहित्य संमेलनाची निवडणूक पद्धत बंद झाल्याने बिनविरोध निवड करण्याची पद्धत सुरू झाली आहे़ या संमेलनासाठी फारसा खर्च येणार नाही कारण यासाठी आवश्यक असणाºया सर्व सोयीसुविधा आणि सभागृहासह साधनसामग्री सावानाकडे उपलब्ध आहेत़ - चंद्रकांत महामिने

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक