शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साहित्यिकांची ‘स्वत:च्या जगण्याची गोष्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:02 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसांगता : तीन दिवसीय अक्षर साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते व कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचे उद्घाटन झाले. समाजात सांस्कृतिक प्रदूषणाची जेव्हा भीती वाटत असते तेव्हा अक्षर मानवसारखी साहित्य संमेलने ही आश्वासक वाटतात, असे प्रतिपादन आमदार टकले यांनी उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी हे साहित्य संमेलन विद्यापीठात होणे म्हणजे विद्यापीठाच्या सामाजिक योगदानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी खरे साहित्यिक लेखन हे सहज प्रकारचे वा ‘स्वांत सुखाय’ असे लेखन नसून तो गंभीर लेखन प्रकार असल्याचे सांगितले. त्यात लेखकाच्या मनाची दीर्घकाळ गुंतवणूक असते, त्याची बौद्धिक व शारीरिक कसरत या काळात सुरू असते. साहित्यिकाने एकप्रकारच्या मरण यातना भोगल्यानंतरच अस्सल साहित्य जन्माला येत असते, असे पठारे म्हणाले.सत्रनिहाय विविध विषयांवर सहभागी साहित्यिकांनी आपापली मते मांडली. सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे, श्रीकांत चौगुले, रविप्रकाश कुलकर्णी, अशोक थोरात, संदीप खाडिलकर, सुबोध जावडेकर आदी साहित्यिकांच्या चर्चासत्रांनी संमेलनात विशेष रंग भरला.कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी अध्यासनाविषयी माहिती दिली. यावेळी दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘नेब्युला’ या नाटकाचा प्रयोग या संमेलनात सादर करण्यात आला. डॉ. मनीषा जगताप यांची निर्मिती असलेल्या या प्रायोगिक नाटकातराम दौंड, दीप्ती चंद्रात्रे, उर्वराज गायकवाड, एकता आढाव यांच्या भूमिका आहेत.टकले यांची मुलाखत रंगलीअक्षर मानव साहित्य संमेलनाचे प्रणेते व प्रख्यात साहित्यिक राजन खान यांनी आमदार हेमंत टकले यांची ‘लोकप्रतिनिधीमधील साहित्यिक’ याविषयी घेतलेली छोटेखानी मुलाखत विशेष ठरली. त्यात आमदार टकले यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतच्या साहित्यिक, राजकीय आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक